शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

मुंबई ( २० सप्टेंबर ) : उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल राजा शिवाजी विद्या संकुल दादर येथे सत्कार करण्यात आला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले, वाढत्या आव्हानामुळे यापुढे शिक्षणात बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य संस्कार देणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांनीही आपले समाजाप्रती काही देणं आहे, अशी भावना ठेवावी, असे ते म्हणाले. यावेळी राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेली अपूर्वा राजाध्यक्ष, द्वितीय आदित्य रानडे तसेच आय. ई. एस. वांद्रे पूर्व शाळेची विद्यार्थिनी यशस्वी ओरके हिच्यासह गुणवत्ता प्राप्त 185 विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास साठे विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.कविता रेगे, संस्थेचे अध्यक्ष अरविंद वैद्य, विश्वस्त, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget