नाशिकच्या शिरपेचात मानाचा तूरा ! ' मिस ग्लोबल एशियाचा २०१७ ' या कॉन्टिनेन्टल टॉईटल्स ची नाशिकची भैरवी बुरड ठरली विजेती

जमैका येथील मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत पहिल्या दहामध्ये

नाशिक ( १६ सप्टेंबर ) : नुकत्याच जमैका येथे संपन्न झालेल्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत नाशिकची कन्या भैरवी प्रदीपलाल बुरड (वय वर्ष २०) हिने अंतिम फेरीत धडक मारत पहिल्या १० क्रमांकामध्ये नंबर पटकाविण्याचा पराक्रम केला आहे.तर याच स्पर्धेत ती ' मिस ग्लोबल एशियाचा २०१७ ' या कॉन्टिनेन्टल टॉईटल्सची विजेती ठरली आहे. काल दि.१५ सप्टेंबर २०१७ रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. कु.भैरवी बुरड ही नाशिक मधील बीवायके महाविद्यालयात कॉमर्स शाखेत टीवायबीकॉम चे शिक्षण घेत आहे.

ऑगस्ट २०१७ मध्ये नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत कु.भैरवी बुरड हिने मिस ग्लोबल इंटरनॅशनल विजेतेपद पटकाविले आहे. याच स्पर्धेत तीने बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनिॲलिटी हा किताब पटकाविला आहे. तसेच सप्टेंबर २०१७ मध्ये सेंट्रल अमेरिकेत झालेल्या सौंदर्य स्पर्धेत कु.भैरवी हिने पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकाविला आहे.

मध्यमवर्गीय कौटूंबिक पार्श्वभूमी असलेल्या भैरवी बुरडने यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये संपन्न झालेल्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल इंडिया २०१७ या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या सौदर्यवतीला इंटरनॅशनल स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होते. १० सप्टेंबर २०१७ रोजी जैमकाच्या मोंटीगोको शहरामध्ये संपन्न झालेल्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेतील भैरवीने धडक मारत पहिल्या दहा क्रमांकामध्ये नंबर पटकाविण्याचा पराक्रम केला आहे. तर याच स्पर्धेत ती ' मिस ग्लोबल एशियाचा २०१७ ' या कॉन्टिनेन्टल टॉईटल्सची विजेती ठरली आहे. यामुळे प्रथमच नाशिकच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला गेला आहे.

तीन वर्षे वयाची असल्यापासून भैरवीला नृत्याची आवड आहे. तीने आतापर्यंत नृत्याच्या विविध स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकाविले आहेत. २०१६मध्ये संपन्न झालेल्या मिस टीजीपीसी (The Great Pagent Community) या ऑनलाइन सौंदर्य स्पर्धेत भैरवी ही विजेती ठरलेली आहे. दिल्ली येथील दी उमराव येथे झालेल्या अब्राक्सस गॉडेस ऑफ ब्यूटी २०१७ या राष्टीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत कु.भैरवी बुरड हिने विजेतेपद पटकाविले आहे.

आई-वडिलांचे प्रोत्साहन, आप्त-स्वकियांच्या शुभेच्छा व स्वत:वरील आत्मविश्वास यांच्यामुळेच मी या स्पर्धेत यश पटकावू शकलो. असा शब्दात कु.भैरवी बुरड आपल्या भावना व्यक्त केल्या.व भविष्यात मिस इंडिया चा किताब पटकावत मिस वर्ल्ड/मिस युनिव्हर्स चा किताब पटकाविण्याचा मनोदय कु.भैरवी बुरड हिने व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget