मराठवाड्याच्या विकासाला राज्य सरकारचा अग्रक्रम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद (१७ सप्टेंबर ) : मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी शेती, उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज येथे सिध्दार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केल्या नंतर ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्याचा विकास ही राज्य सरकारच्या दृष्टीने अग्रक्रम असलेली बाब आहे, असे सांगितले.

हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन फडणवीस यांनी आजचा दिवस हुतात्म्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा, स्वातंत्र्य सैनिकांचे आशीर्वाद घेण्याचा आणि विकासासाठी कटिबध्द होण्याचा आहे, असे नमुद केले. अन्न सुरक्षेच्या माध्यमातून 40 लाख कुटूंब पात्र ठरली आहेत. पंतप्रधान पीक विमा योजना 2017-18 अंतर्गत राज्‍यात एकूण 62.36 लाख शेतक-यांनी सहभाग घेतला असून त्‍यापैकी 53 लाख शेतकरी मराठवाडयातील आहेत. राज्‍यातील एकूण शेतकरी संख्‍येच्‍या तुलनेत हे प्रमाण 80 टक्‍के इतके आहे. याही वर्षी पीक विमा योजनेत मराठवाडा अग्रेसर राहिला आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेचे कौतूकास्पद काम झाले असून या योजनेमुळे साडेचार लाख हेक्टर एवढ्या क्षेत्राला पाणी मिळाले आहे. यामुळे पूर्वी फक्त खरीपाचे पीकं काढणारे शेतकरी रब्बीचेदेखील पीक घेऊ लागले आहेत. मराठवाड्यातील धरणांच्या कामांना चालना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर ग्रिड प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. या वॉटर ग्रिडमुळे मराठवाड्यातील उद्योग तसेच शेतीला वरदान मिळणार असल्याचे सांगूण मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कृष्णा खोऱ्यातून मिळण्यासाठी शासनाने मान्यता दिली. केंद्र शासनाच्या माध्यमातून दमणगंगा प्रकल्पाचे 50टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी तत्वत: मान्यता मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्राचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी डीएमआयसी प्रकल्पा अंतर्गत अकरा हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबाद येथे ऑरीक सिटी या नावाने असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे 3 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस आणि अन्य मान्यवरांनी हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली.

• धरणांच्या कामाला चालना देणार
• वॉटर ग्रिड प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू
• ऑरिक सिटी च्या माध्यमातून रोजगार निर्मिती
• जलयुक्त शिवारामुळे साडेचार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
• मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मान्यता

या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार संजय सिरसाट, आ. अब्दुल सत्तार, आ. एम.एम. शेख आ. अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगांवकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, विविध स्वातंत्र्यसैनिक, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव,औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक मिलिंद भारंबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. भारती सिंह, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget