अखेर नारायण राणे यांची काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी

सिंधुदुर्ग ( २१ सप्टेंबर ): नारायण राणे यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सोबत राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला.

दरम्यान, निलेश राणेंनीही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती यावेळी राणेंनी दिली. नितेश राणेंबाबत योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ. पण नितेश राणेंच काय काँग्रेस आणि शिवसेनेमधीलही अनेक आमदार राजीनामा देतील, असे नारायण राणे यांनी सांगितले.

पुढचा निर्णय नवरात्र संपण्याच्या आत घेणार असल्याचे राणे यांनी सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, माझ्याकडे अनेक पक्षाच्या ऑफर असून योग्य ठिकाणी योग्य वेळी निर्णय घेऊ. पण कोणाची काय ऑफर आहे ते मी योग्य वेळी तपासेन.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget