मनोरा आमदार निवास 1 नोव्हेंबर 2017 पूर्वी रिकामे करणार

मुंबई ( १२ सप्टेंबर ) : मनोरा आमदार निवासाचे बांधकाम पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबर 2017 पूर्वी तेथील सर्व कक्ष रिकामे करण्यात यावे. तसेच तेथील विधीमंडळ सदस्यांना घाटकोपर येथील इमारतीमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती माणिकराव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुमित मलिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सहसचिव अशोक मोहिते, बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) ए.ए. सगणे आदी यावेळी उपस्थित होते.

मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी एनबीसीसीच्या माध्यमातून करण्यात यावी. घाटकोपर येथे 324 निवासस्थाने उपलब्ध असून ही निवासस्थाने सदस्यांना वाटप करण्यात यावीत अणि यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात , असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget