अंगणवाडी सेविकांनी कामावर हजर होण्याचे आवाहन

मुंबई ( १४ सप्टेंबर ) : राज्यातील अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांना, विशेष करुन आदिवासी भागातील लाभार्थ्यांना पोषण आहाराचा नियमित पुरवठा सुरु राहण्यासाठी स्थानिक पातळीवरील इतर शासकीय यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे. पोषण आहार वाटपाच्या कामकाजावर तसेच आरोग्यविषयक सुविधांवर संपाचा कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद – सिंगल यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक असून, त्याबाबत कार्यवाही सुरु आहे. यासाठी काही कालावधी लागणार आहे. सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण योजनेसाठी नियुक्त केलेल्या कामावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने हजर व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन वाढविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून 11 सप्टेंबर पासून बेमुदत संप सुरु करण्यात आला आहे. त्या
पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आशा वर्कर, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शाळा शिक्षक, ग्रामशिक्षण समितीच्या सहाय्याने तसेच स्थानिक गरम ताजा आहार पुरवणारे महिला बचत गट इ. माध्यमातून पर्यायी व्यवस्था म्हणून पोषण आहार वाटपाचे कार्य महिला
बालविकास विभाग, ग्रामविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. पोषण आहार वाटपाच्या कामकाजावर तसेच आरोग्यविषयक सुविधांवर संपाचा कोणताही परिणाम झालेला नाही. जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व महिला - बालविकास अधिकारी
यांना अंगणवाडी स्तरावरील कामकाजावर संपाचा कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती वेद – सिंगल यांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget