डेंग्यू, मलेरिया आदी आजारांबाबत शास्त्रशुद्ध माहिती देणारे नवीन 'ॲप'

महापालिकेच्या उपचार केंद्रांचीही माहिती मिळणार
सदर ॲप 'गुगल प्ले स्टोअर' वर मोफत उपलब्ध

मुंबई (१८ सप्टेंबर ) : डेंग्यू, मलेरिया (हिवताप), एच१एन१ (स्वाईन फ्ल्यू), लेप्टोपायरोसिस, चिकुनगुन्या यासारख्या पावसाळी आजारांबाबत सर्वसामान्यांना सहजपणे माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एक विशेष ॲन्ड्रॉईड ॲप तयार करण्यात आले आहे. 'Monsoon Related Diseases' या नावाचे हे ॲप मोफत उपलब्ध असून यामध्ये पावसाळी आजारांबद्दलची माहिती, आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आजार झाल्यास काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात महापालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांचे संपर्क क्रमांक / पत्ते देखील देण्यात आले आहेत. या ॲपचे औपचारिक लोकार्पण महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते उद्या मंगळवार दि. १९ सप्टेंबर २०१७ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. सीमा बनसोडे - गोखे यांनी दिली आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) सुनिल धामणे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील 'सामुदायिक औषध विभाग' व कांदिवली परिसरातील 'ठाकूर इंन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज' यांच्या पुढाकाराने; तसेच महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व कीटकनाशक खाते यांच्या सहकार्याने हे ॲप तयार करण्यात आले आहे.

डेंग्यू, मलेरिया, एच१एन१ (स्वाईन फ्ल्यू), लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुन्या यासारख्या आजारांबाबत इंटरनेटवर माहिती उपलब्ध असू शकते. मात्र, ही माहिती शास्त्रशुद्ध असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन
महापालिकेच्या वरिष्ठ डॉक्टरांनी व संबंधित तज्ज्ञांनी या आजारांबाबत शास्त्रशुद्ध माहिती देणारे हे बहुपयोगी ॲन्ड्रॉईड ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये आजाराबद्दलची सविस्तर माहिती, आजाराचा प्रसार कसा होतो व त्याची कारणे काय? प्रसार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी? काय करावे व काय करु नये? (Do's and Don'ts) इत्यादी माहिती देण्यात आली आहे.

त्याचबरोबर आजाराची लक्षणे कोणती, आजार झाल्यास काय काळजी घ्यावी?
याबाबतचीही माहिती या ॲपमध्ये देण्यात आली आहे. तसेच आजार झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांचेही विभागनिहाय संपर्क क्रमांक / पत्ते या ॲपद्वारे देण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने कीटकनाशक खात्याचेही संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 'Monsoon Related Diseases' या नावाचे हे ॲन्ड्रॉईड ॲप 'गुगल प्ले स्टोअर' वर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर 'Monsoon Related Diseases' या नावाने सर्च करुन हे ॲप आपल्या ॲन्ड्रॉईड स्मार्ट फोनवर सहजपणे डाऊनलोड व इन्स्टॉल करता येणार आहे. उद्या मंगळवारी शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात आयोजित होणा-या 'निरंतर वैद्यकीय शिक्षण' कार्यक्रमादरम्यान या ॲपचे औपचारिक लोकार्पण करण्यात येणार आहे. अशीही माहिती डॉ. बनसोडे - गोखे यांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget