सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या सहकार्याने आम्ही एम.ए. उत्तीर्ण झालो

मुंबई ( १२ सप्टेंबर ) : सध्या महापालिकेच्या बी वॉर्डात आंनदाचे वातावरण आहे. येथील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि शिपाई एम. ए. उत्तीर्ण झाले आहेत. आता काहींना पीएचडी करुन स्वतः च्या नावापुढे 'डॉक्टर' लावायच आहे, त्यासाठी त्यांनी पाऊल ही उचले आहे. पण हे यश केवळ आमचे सहाय्यक आयुक्त शिरुरकर साहेब यांच्यामुळेच संपादीत करता आले. अन्यथा आम्ही उत्तीर्ण तर सोडाच आम्हाला परीक्षाही देता आली नसती, अशी भावूक प्रतिक्रिया या सर्वांनी व्यक्त केली.

एम. ए. उत्तीर्ण वीणा सावर्डेकर या बी वॉर्डात वरिष्ठ लघुलेखक पदावर काम करतात. त्या म्हणाल्या, महिलांना नोकरी करताना घर ही सांभाळायचे असते. अशावेळी अभ्यासाला वेळ मिळत नाही. पण त्यातूनही कसाबसा वेळ काढून अभ्यास करून एम. ए. करायच ठरविले होते.

शिपाई पदावर कायम स्वरूपी काम न करता शिक्षणाच्या जोरावर पुढे विविध पद भुषविण्यासाठी रश्मी यांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पुर्ण करीत, पदवी संपादित करून एम. ए. करण्याचे स्वप्न यंदा साकार केले. त्या म्हणाल्या की, मी जरी शिपाई पदावर काम करत असले तरी शिक्षणाच्या जोरावर पुढे जाऊ शकते, हे मला माहीत असल्यानेच आज एम. ए. उत्तीर्ण झाल्याचा आंनद होत आहे.

बी वॉर्डातील 14 जण मराठी भाषेतून एम. ए. उत्तीर्ण झाले आहेत. अनिल चव्हाण हे तक्रार निवारण अधिकारी असून एम. ए. उत्तीर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, मराठी भाषेतून महापालिकेचे कामकाज चालते. प्रशासकीय कामकाजाची मराठी भाषा अवघड आहे. याकरीता मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता मराठी भाषेतूनच एम. ए. झाल्याने या अभ्यासाचा फार उपयोग प्रशासकीय कामकाज करताना होणार आहे.

पंकज पोतदार हे लिपक पदावर कार्यरत असून डॉक्टर झालो नाही पण आपल्या नावापुढे डॉक्टर लावण्याचे स्वप्न होते. ते आता एम.ए. नंतर पीचडी केल्यावर साकरता येणार असल्याने आनंदीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

यांच्या सोबत पूर्वा पावसकर ( प्रशासकीय अधिकारी ), सायली राणे ( मुख्य लिपीक ), मनाली जाधव ( मुख्य लिपीक), शैला म्हात्रे ( लिपीक ) ,महेश नांगरे ( लिपीक ) , समृध्दी रेडकर ( लिपीक ), तुषार लोखंडे ( कनिष्ठ लेखापाल ) आणि जालींदर नरळे ( सुरक्षा रक्षक ) एम. ए. पास झाले आहेत. पण हे यश सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्यामुळे साध्य करता आले, अशी प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केली.

महापालिका निवडणुकी दरम्यान आमच्या एम. ए. परीक्षेचे वेळापत्रक लागले होते. पण निवडणुकीच्या कामकाजाच्या कालावधीत पालिका कर्मचाऱ्यांना सुट्टी नाकारण्यात आली होती. परीक्षेसाठी सुट्टी मिळावी, असा अर्ज करुन ही कित्येकांच्या सुट्ट्या नाकारण्यात आल्या होत्या. त्यात परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तरी सुट्टी मिळणे शक्यच नव्हते, असे सावर्डेकर म्हणाल्या.

तरीही आम्ही सहाय्यक आयुक्त शिरुरकर यांच्याकडे जाऊन आमच्या परीक्षेचा विषय मांडला. आम्ही शिक्षण घेत असल्याचे त्यांना सांगताच, ते फार खुश झाले. तुम्हाला पाहिजे ती मदत मी तुमचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितल्याने, आम्ही आनंदीत झालो. त्यांनी आम्हा सर्वांच्या परीक्षेसाठी सुट्ट्या मंजूर केल्याच सोबत पाहिजे तेव्हा अभ्यासासाठी वेळ मिळावा, यासाठी ही सुट्ट्या मंजूर केल्या, असे चव्हाण म्हणाले.

त्यांनी जर आम्हाला परीक्षेला बसण्यासाठी सुट्ट्या मंजूर केल्या नसत्या तर आज आम्हाला ही इतर वॉर्डातील कर्मचाऱ्यांप्रमाणे परीक्षा देता आली नसती. आमचे एम.ए. पास होण्याचे स्वप्न साकार करता आले नसते, अशी भावूक प्रतिक्रीया सर्वांनी व्यक्त केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget