मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण 3 ऑक्टोबरपासून

मुंबई ( २७ सप्टेंबर ) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यात 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. 3 ऑक्टोबर 2017 ते 5 जानेवारी 2018 या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी आज दिली.

कार्यक्रमानुसार मतदार याद्यांची दि. 3 ऑक्टोबर 2017 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी करण्यापूर्वी तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यातील त्रुटी व उणीवांचा शोध घेण्याचे काम केले जाणार आहे. तसेच मतदार यादीमधील मयत आणि दुबार मतदारांची नावे शोधून ही नावे कमी करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2017 रोजी केली जाणार आहे. दावे व हरकती दि. 3 ऑक्टोबर ते ते दि. 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्विकारल्या जाणार आहेत. मतदार यादीमधील संबंधीत भाग, सेक्शनच्या ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम दि. 7 ऑक्टोबर आणि दि. 13 ऑक्टोबर 2017 रोजी केले जाईल. रविवार दि. 8 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. 5 डिसेंबर 2017 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यवतीकरण आदी ‍दि.20 डिसेंबर 2017 पर्यंत केले जाईल आणि दिनांक 5 जानेवारी 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2017 या कालावधीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने 18 ते 21 वयोगटातील तरुण व पात्र मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2017 ची मूळ मतदार यादी तसेच पुरवणी याद्यांचे विलनीकरण व एकत्रीकरण करुन प्रारुप मतदार यादी दि.3 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान केंद्रावर तसेच मध्यवर्ती मतदान केंद्रात (सीपीएस) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दि. 8 ऑक्टोबर व दि.22 ऑक्टोबर 2017 या दोन सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए) यांची नियुक्ती करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सायकल रॅली, पथनाटये अशा कार्यक्रमांचेही आयोजन करुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

मतदार नोंदणी, वगळणी, पत्त्यामधील दुरुस्ती आदींसाठीचे विहीत नमुने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित बीएलओ स्तरावर करता येईल शिवाय http://www.nvsp.in/ या वेबपोर्टलवर योग्य त्या पुराव्यांसह ऑनलाईनरित्या अर्ज करता येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget