वन कर्मचारी अक्रम खान यांची चीन येथील ॲथलेटिक्स चैम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन

मुंबई ( ११ सप्टेंबर ) : वन कर्मचारी अक्रम खान यांची चीन येथील ॲथलॅटिक्स चैम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वन विभागातील कर्मचारी अक्रम खान हे निवृत्त सेना कर्मचारी असून सध्या ते नागपूर येथील वन विभागात शिपाई पदावर कार्यरत आहेत. खान हे ॲथलेटिक असून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. दि. २४ सप्टेंबर २०१७ रोजी चीन (रुगाव, जियांग्स) येथे होणाऱ्या एक्सएक्स एशिया मास्टर्स ॲथलिटिक्स चैम्पियनशिप 2017 मध्ये भाग घेऊन ते आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या अक्रम यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमधून अनेक पदके मिळविली आहेत. महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनने यावर्षी हैदराबाद येथे आयोजित केलेल्या 38
व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स पात्रता स्पर्धेतून त्यांची चीन येथील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ते 100 मीटर, 200 मीटर, 4x100 मी. दौड स्पर्धेत सहभागी होऊन देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

अक्रम खान (५३) हे निवृत्त सेना कर्मचारी असून, ते सध्या कामठी येथे वास्तव्याला आहेत. खान यांनी १९ वर्षे सैन्यदलात सेवा केली आहे. तिथे असल्यापासूनच ते ऍथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आले आहेत.
त्याचबरोबर त्यांनी अनेक सुवर्ण पदकेही मिळविली आहेत. ते १३ वर्षापासून वन खात्यात सेवा देत आहेत. फेब्रुवारी २०१० मध्ये यवतमाळ येथे आयोजित केलेल्या १००,२००,४०० मीटर, ४ x१०० मीटर रिले स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्रामधून ४ सुवर्ण पदके जिंकली. फेब्रुवारी २०१७ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत राजस्थान येथे कांस्यपदक पटकावले. अक्रम यांनी जून २०१७ ला राजस्थानमध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 4x100 मीटर रिले आणि 5000 मीटर मॅरेथॉनमध्ये आयोजित केलेल्या खुल्या आव्हान स्पर्धेत सहभाग घेतला आणि 5 रजत पदके जिंकली आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget