शेतकरी कर्ज माफी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई ( १४ सप्टेंबर ) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर होती. शेतकऱ्यांच्या सोईसाठी 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, आता दि. 22 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

आजपर्यंत 96 लाख 59 हजार 740 अर्जाची नोंदणी झाली असून 49 लाख 56 हजार 305 शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. कर्ज माफीसाठी अर्ज भरण्याची अंतीम मुदत या आधी 15 सप्टेंबर होती. ती मुदत उद्या संपणार होती. अजून अनेक शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याचे बाकी असल्याचे लक्षात आल्यानंतर, या शेतकऱ्यांच्या सोईसाठी दि.22 सप्टेंबर पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget