मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबई ( १९ सप्टेंबर ) : हवामान विभागाने आजच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. संपूर्ण कोकण पट्ट्यासह मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. पावसाची सुरुवात होताच मुंबईतील अनेकांनी घर गाठण्यासाठी लवकर ऑफीसमधून निघण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुपारपासूनच स्थानकांवरील गर्दी वाढली. नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा भागातही पाऊस पडत आहे. दरवर्षी सरासरी ३० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातून पावसाच्या परतीला सुरुवात होते. पण यंदा पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सध्या वेळेवर असली तरी मध्य आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget