मुंबईकरांना मिळणार २१ लाख चौ. फू. पेक्षा अधिक आकाराच्या खुल्या जागा

४१ भूखंडांवर २५ उद्याने व १६ क्रिडांगणे प्रस्तावित

प्रस्तावित डी.पी. मधील उद्याने - मैदाने: अंमलबजावणीसाठी ३० कोटींची तरतूद

मुंबई ( २६ सप्टेंबर ) : बृहन्मुंबई महापालिकेचा प्रस्तावित 'प्रारुप विकास आराखडा २०३४' हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला, तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा सुविधा विषयक बाबींची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या अंतर्गत महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ४१ भूखंडांवर नवी उद्याने / मनोरंजन मैदाने / क्रिडांगणे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे भविष्यात मुंबईकरांना २५ नवी उद्याने /मनोरंजन मैदाने व १६ क्रिडांगणे उपलब्ध होऊ शकणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.

विशेष म्हणजे सुमारे २१ लाख ८० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक एकूण आकारमान असणा-या वेगवेगळ्या ४१ भूखंडांच्या विकासासाठी एकूण ३० कोटी रुपयांची प्रातिनिधिक तरतूद अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात करण्यात आली आहे,अशीही माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे. उद्याने - मैदाने यांचा समावेश बृहन्मुंबई महापालिकेद्वारे दिल्या जाणा-या विविध नागरी सेवा सुविधांमध्ये आहे. या सुविधा आणखी प्रभावीपणे देता याव्यात, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून उद्याने - क्रिडांगणे विषयक असणारी जी आरक्षणे १९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यात आहेत आणि ती जशीच्या तशी २०३४ च्या प्रारुप विकास आराखड्यात देखील दर्शविण्यात आली आहेत;त्याचबरोबर सदर आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात असून मोकळया आहेत आणि याशिवाय ज्या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत, अशी आरक्षणे विकसित करण्यासाठी महापालिकेने अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेतला आहे.

'प्रारुप विकास आराखडा २०३४' साठी महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे. हा २० वर्षांचा आराखडा ४ पंचवार्षिक टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. तसेच प्रत्येक पंचवार्षिक टप्पा देखील पुन्हा वार्षिक टप्प्यामध्ये विभागण्यात आला आहे. याप्रमाणे विकास नियोजन आराखड्यानुसार प्रत्येक वर्षी अंमलबजावणीसाठी हाती घ्यावयाच्या नवीन कामांसाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशीही माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता दराडे यांनी दिली आहे.

महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सध्या महापालिकेची १ हजार ४२ उद्याने / मनोरंजन मैदाने / क्रिडांगणे आहेत. यातील ३०५ भूखंडांवर क्रिडांगणे आहेत; तर उर्वरित ७३७ भूखंडांवर उद्याने / मनोरंजन मैदाने आहेत. आता प्रस्तावित विकास आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेली संबंधित आरक्षणे विकसित करावयाचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबईकरांना २५ नवी उद्याने व खेळण्यासाठी १६ क्रिडांगणे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील उद्यानांची एकूण संख्या ७६२; तर क्रिडांगणांची संख्या ३२१ एवढी होणार आहे,अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

वरीलनुसार नव्याने विकसित करण्यात येणारी २५ उद्याने / मनोरंजन मैदाने यापैकी सर्वात मोठे उद्यान / मनोरंजन मैदान हे 'के पश्चिम' विभागातील आंबिवली, ओशिवरा परिसरातील ५ लाख २८ हजार १५४ चौरस फुटांच्या भूखंडावर;तर १६ क्रिडांगणांपैकी सर्वात मोठे क्रीडांगण हे मालाड परिसरातील १ लाख ५ हजार ४१६ चौरस फुटांच्या भूखंडावर प्रस्तावित करण्यात आले आहे.

याचप्रमाणे २ लाख २२ हजार ४२७ चौरस फूट आकाराच्या आकुर्ली परिसरातील(आर दक्षिण) भूखंडावर उद्यान / मनोरंजन मैदान प्रस्तावित करण्यात आले आहे.तर माहुल परिसरातील (एम पश्चिम) १ लाख ८९ हजार ५१७ चौ. फू., मुलुंड परिसरातील (टी) १ लाख ४८ हजार ४८८ चौ. फू., वांद्रे परिसरातील (एच पश्चिम) १ लाख ३५ हजार ८२३ चौ. फू., मारवली, राहुल नगर (एम पूर्व) परिसरातील १ लाख ३ हजार ६६१ चौ. फू. आणि भांडुप परिसरातील (एस) १ लाख २ हजार ९६९ चौरस फुटांच्या भूखंडावर देखील उद्यान / मनोरंजन मैदान प्रस्तावित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या ताब्यातील ज्या ४१ भूखंडांवर उद्याने मनोरंजन मैदाने /क्रिडांगणे विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत्याबाबतचा विभागवार तपशील पुढीलप्रमाणे आहेः

.क्र.
परिमंडळ
विभाग
भाग गाव
(भूमापन नोंदींनुसार)
क्रीडांगण
(क्षेत्रफळ चौ.फू.)
उद्यान
(क्षेत्रफळ चौ.फू.)
1

एक
सी
भुलेश्वर
5146.72
0
2
सी
भुलेश्वर
0
1937.45
3
भायखळा
0
36150.69
4

तीन
एच /पश्चिम
वांद्रे
0
135823.48
5
के /पूर्व
मोगरा
7498.64
0
6
के पूर्व
कोंडीविटा
0
45590.12
7

चार
के /पश्चिम
ओशिवरा
38090.4
0
8
के /पश्चिम
आंबिवलीओशिवरा
0
528154.6
9
पी /दक्षिण
पहाडीगोरेगाव प.
0
31392.3
10
पी /दक्षिण
मालाड
0
5378.92
11
पी /उत्तर
वळणाई मालाड द.
105416.04
0
12
पी उत्तर
मालवणी
0
13826.6
13
पाच
एल
चांदिवली
0
30926.28
14
एल
कुर्ला
0
26594.31
15
एल
मोहिली
4381.47
0
16
एल
मोहिली
4381.47
0
17
एम /पूर्व
मारवली (राहुल नगर)
0
103661.84
18
एम पूर्व
देवनार
0
54736.12
19
एम पूर्व
देवनार
0
43760.92
20
एम /पश्चिम
माहुल
0
189517.17
21
एम /पश्चिम
वढवली
27442.95
0
22

सहा


एन
किरोळ
0
23306.16
23
एन
किरोळ
0
16247.6
24
एन
किरोळ
0
12912
25
एन
घाटकोपर
0
17398.92
26
एस
भांडुप
0
102969.43
27
टी
मुलुंड
0
21864.32
28
टी
मुलुंड
0
148488
29


सात
आर /दक्षिण
आकुर्ली
0
222427.49
30
आर /दक्षिण
चारकोप
0
10208.01
31
आर /मध्य
मागाठाणे
0
5239.04
32
आर /मध्य
मागाठाणे
0
25284.92
33
आर /मध्य
एकसर
6922.98
0
34
आर /मध्य
बोरिवली
13700.71
0
35
आर /मध्य
बोरिवली
11868.28
0
36
आर /मध्य
बोरिवली
8304.57
0
37
आर /मध्य
बोरिवली
3052.61
0
38
आर /मध्य
कांदिवली
22580.94
0
39
आर /उत्तर
एक्सर
17091.18
0
40
आर /उत्तर
दहिसर
25824
0
41
आर /उत्तर
दहिसर
25015.92
0


एकूण
326718.88
1853796.69
2180515.57
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget