गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली वाणी चाळीची पहाणी

मुंबई (१८ सप्टेंबर ) : ना. म. जोशी मार्ग डिलाईट रोड येथील मोडकळीस आलेल्या वाणी चाळीची गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार अजय चौधरी, नगरसेविका किशोरी पेडणेकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे तसेच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या चाळीची पाहणी केल्यानंतर येथील रहिवाशांसमवेत झालेल्या बैठकीत वायकर म्हणाले, रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना 400 चौ.फुटाचे घर देण्यात येईल. इमारतीचे बांधकाम 2 ते 3 वर्षात पूर्ण करण्यात येईल. चाळीची पुनर्बांधणी करताना रहिवाशांना याच ठिकाणी संक्रमण शिबीरात जागा देण्यात येईल. वारसा हक्क संदर्भात नाते संबंधाची योग्य ती कागदपत्रे तपासून हक्क देण्यात येईल. येथील रहिवाशांची नोंदणी बायोमॅट्रिक पद्धतीने करण्यात येईल, असे सांगून रहिवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार चौधरी यावेळी म्हणाले, येथील रहिवाशांची समस्या गंभीर आहे. त्यामुळे या चाळीच्या पुनर्वसनाचे काम तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे. येथील रहिवाशांना जवळच संक्रमण शिबीर उपलब्ध करुन दिल्यास ते जागा रिकामी करण्यात तयार होतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget