खेळाडूंसाठी बालेवाडीत स्पोर्टस सायन्स सेंटर तयार करणार – विनोद तावडे

मुंबई ( २८ सप्टेंबर ) : चांगला खेळाडू घडण्यासाठी जसे प्रशिक्षक आणि इतर अनुषंगिक बाबी आवश्यक असतात, त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी एकाच ठिकाणी स्पोटर्स सायन्स सेंटर असणेही आवश्यक बनले आहे. जेणेकरुन या सेंटरमध्ये खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी, सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. महाराष्ट्रात अशा प्रकारचे सेंटर पुण्यातील बालेवाडी येथे तयार होत असल्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.

तावडे यांनी यावेळी विविध खेळांमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या 24 खेळाडूंचा सत्कार केला. या सत्कार सभारंभानंतर तावडे म्हणाले, महाराष्ट्रातील खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी परदेशात जात असतो तेव्हा त्या खेळाडूला शेवटच्या क्षणापर्यंत व्हिसासाठी धावपळ करावी लागते. त्याची दखल शासनाने घेतली असून आता क्रीडा विभाग आणि राजशिष्टाचार विभाग एकत्रपणे महाराष्ट्रामार्फत परदेशात जाणाऱ्या खेळाडूंच्या व्हिसासाठी पाठपुरावा करतील. खेळाडूंनी आपल्या खेळावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

केंद्रीय क्रीडा मंत्री एक खेळाडू असल्याचा सर्वांनाच अभिमान

येणाऱ्या काळात वेगवेगळया खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू चांगले यश संपादन करतील असा विश्वास वाटत असून आज भारताचा केंद्रीय क्रीडा मंत्री हे खेळाडू आहेत. याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. खेळाडूला येणाऱ्या सर्व अडचणी, तणाव यांची त्यांना माहिती आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री महोदयांनी भारताच्या खेळाडूंना दिलेला हा पाठिंबा अत्यंत महत्वाचा असून येणाऱ्या काळात भारत क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करेल असा विश्वास वाटतो असेही तावडे यावेळी म्हणाले.

नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण आणि थेट नियुक्ती

आज महाराष्ट्रातील विदयार्थ्यांनी खेळात करीअर करावे यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. एखादा विदयार्थी खेळात जर चांगला असेल तर त्या विदयार्थ्यांचे खेळातही चांगले करीअर होऊ शकते. राज्य शासन तर महाराष्ट्रात चांगले खेळाडू घडावे यासाठी प्रोत्साहन देत आहे. सर्वांसाठी शिक्षण या कायदयानुसार तर शाळांना मैदान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य शासनामार्फत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याबरोबरच काही खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार थेट नियुक्तीही देत आहे. राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण ठेवण्यात आले असल्याचे तावडे यावेळी म्हणाले.

5 ते 21 ऑगस्ट 2016 या कालावधीत ब्राझील येथे झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक प्राप्त करुन देणाऱ्या पी.व्ही.सिंधु (बॅडमिंटन) यांना यापूर्वीच 75 लाख रुपयांचे आणि पी.व्ही.सिंधू यांचे क्रीडा मार्गदर्शक श्री.गोपीचंद यांना 25 लाख रुपये रोख बक्षिस/पुरस्कार देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 सप्टेंबर 2016 रोजी मुंबई येथील कार्यक्रमात पी.व्ही. सिंधू आणि गोपीचंद यांचा सत्कार करण्यात आला होता.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू, मार्गदर्शक व राज्यातील सहभागी खेळाडू यांचा खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आशीष शेलार यांच्यासह क्रीडा संचालक, सहसंचालक उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget