मोहरम काळात मानखुर्दमधील वाहतूक मार्गात बदल

मुंबई ( २६ सप्टेंबर ): मोहरम निमित्त मानखुर्द विभागामध्ये दि. 1 ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली आहे.

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर जंक्शन ते मानखुर्द टी जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना 1 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7 ते दि. 2 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजेपर्यंत प्रवेश बंद आहे. या काळात पुढील
पर्यायी मार्गाचा वापर करावा. पर्यायी मार्ग- घाटकोपर, विक्रोळीकडून येणारी व मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांनी उमरशी बप्पा जंक्शन व्ही. एन. पुरव मार्ग, तर घाटकोपर, विक्रोळीकडे जाणाऱ्या वाहनांनी व्ही. एन. पुरव मार्गाने उमरशी बप्पा जंक्शनकडून जावे. तसेच याकाळात घाटकोपर-मानखुर्द लिंकरोड, मधुकर कदम मार्ग, पी. एल. लोखंडे मार्ग या मार्गावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आले असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget