मंत्रिमंडळ निर्णय -12 सप्टेंबर - महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमात सुधारणा

सुधारित अधिनियम अंमलात येण्यापूर्वी झालेल्या हस्तांतरणांनाच मान्यता

मुंबई ( १२ सप्टेंबर ) : सार्वजनिक न्यासाच्या विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय केलेल्या मालमत्तेच्या हस्तांतरण व्यवहारांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमातील तरतुदीनुसार

पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. मात्र, ही मान्यता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम-2017 अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी पूर्ण झालेल्या व्यवहारांसाठी लागू करण्यात येणार आहे. तसेच त्याचे अधिकार फक्त धर्मादाय आयुक्तांना देण्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम-1950 मधील अनेक तरतुदींखालील मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे विशेषत: बदल अर्ज प्रदीर्घ काळ प्रलंबित राहतात. अशा प्रलंबित दाव्यांमध्ये त्वरित निर्णय प्राप्त होण्यासाठी या अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. श्री. ढोलकिया समितीने प्रस्तावित केलेल्या सुधारणांसंदर्भात चर्चा करून यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम-2017 हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकातील महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम-1950 मधील कलम 36 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

सार्वजनिक न्यासांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी धर्मादाय आयुक्तांची पूर्वमान्यता आवश्यक असूनही ती घेण्यात आली नसल्यामुळे सार्वजनिक न्यासांना किंवा सर्वसामान्य जनतेस अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा अत्यंत अपवादात्मक व असाधारण प्रकरणी काही अटी व शर्तींच्या अधीन राहून पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना प्रदान करण्याची तरतूद कलम 36 मध्ये करण्यात आली आहे. मात्र, विधिमंडळात यासंबंधी झालेल्या चर्चेनुसार ही मान्यता जुन्या किंवा पूर्वीच्या व्यवहारांसाठीच लागू असून ती नवीन व्यवहारांसाठी लागू होणार नसल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार विधेयकातील कलम 36 मधील पूर्वलक्षी प्रभावाने मान्यतेबाबतची स्पष्टीकरणात्मक तरतूद ही महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम-2017 ज्या दिनांकास लागू होईल त्या दिनांकापूर्वी विश्वस्तांनी न्यासाच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत पूर्ण केलेल्या व्यवहारांना लागू असेल अशी सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार आजचा निर्णय घेण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget