एकूण २८ हजार चौ. मी. आकाराच्या १२ भूखंडांवर होणार नव्या शाळा

२०३४ च्या प्रारुप विकास आराखड्यातील आरक्षणांच्या अंमलबजावणीला सुरुवात

शैक्षणिक सुविधांच्या अंमलबजावणीसाठी २६ कोटी ४२ लाखांची तरतूद


मुंबई (१९ सप्टेंबर ) : बृहन्मुंबई महापालिकेचा प्रस्तावित 'प्रारुप विकास आराखडा २०३४' हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला, तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा सुविधाविषयक बाबींच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने सुरुवात केली आहे. या अंतर्गत महापालिकेच्या ताब्यात असलेल्या १२ भूखंडांवर नव्या शाळा बांधण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने अनेक चिमुकल्यांना महापालिका क्षेत्रात शाळा प्रवेशाच्या दृष्टीने अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे एकूण २८ हजार ४५२ चौरस मीटर आकाराच्या वेगवेगळ्या १२ भूखंडांपैकी ४ भूखंडांवर शाळांचे बांधकाम करण्याचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत. या जागांच्या विकासासाठी एकूण २६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

प्राथमिक शिक्षणाचा समावेश हा बृहन्मुंबई महापालिकेद्वारे दिल्या जाणा-या विविध नागरी सेवा सुविधांमध्ये आहे. या सुविधा आणखी प्रभावीपणे देता याव्यात, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.याच प्रयत्नांचा भाग म्हणून शिक्षण विषयक असणारी जी आरक्षणे १९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यात आहेत आणि ती जशीच्या तशी २०३४ च्या प्रारुप विकास आराखड्यात देखील दर्शविण्यात आली आहेत;त्याचबरोबर सदर आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात असून मोकळी आहे आणि याशिवाय ज्या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत, अशी आरक्षणे विकसित करण्यासाठी महापालिकेने अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेतला आहे.

वरीलनुसार मनपा शाळांसाठी आरक्षित असलेले पालिकेचे १० भूखंड,तर पालिकेच्या ताब्यात असलेले इतर २ भूखंड; अशा एकूण १२ भूखंडांवर मनपा शाळा बांधण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ज्या १२ भूखंडांवर मनपा शाळा बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

यामध्ये एकूण ४ कार्यादेश देण्यात आले - कुलाबा, वडाळा पूर्व (कार्यादेश देण्यात आला), विलेपार्ले, मजास (कार्यादेश देण्यात आला), मालवणी, एकसर, बोरिवली, कांदिवली, कांदिवली पश्चिम (कार्यादेश देण्यात आला), तुंगवा, मारवली (कार्यादेश देण्यात आला), मानखुर्द, हरियाली या विभागांचा समावेश आहे.

'प्रारुप विकास आराखडा २०३४' साठी महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे. हा २० वर्षांचा आराखडा ४ पंचवार्षिक टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. तसेच प्रत्येक पंचवार्षिक टप्पा देखील पुन्हा वार्षिक टप्प्यामध्ये विभागण्यात आला आहे. याप्रमाणे विकास नियोजन आराखड्यानुसार प्रत्येक वर्षी अंमलबजावणीसाठी हाती घ्यावयाच्या नवीन कामांसाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याचअंतर्गत नवीन शाळांच्या बांधकामासाठी २०१७ – १८ च्या अर्थसंकल्पात २६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशीही माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता दराडे यांनी दिली आहे.

सध्या महापालिकेच्या१ हजार ४८ प्राथमिक शाळा असून त्यात २ लाख ८७ हजार ९७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महापालिकेच्याच१४७ माध्यमिक शाळामंध्ये ३५ हजार ९२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.याव्यतिरिक्त महापालिकेच्या ४२२ अनुदानित शाळांमधून १ लाख ३८ हजार ४४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यानुसार एकूण १ हजार ६१७ शाळांमधून ४ लाख ६२ हजार ३४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महापालिका क्षेत्रातील ६९३ खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये ३ लाख २५ हजार ४२१ विद्यार्थी आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget