मूग, उडीद खरेदी नोंदणीची ८३ केंद्रे राज्यात सुरू करणार - पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत

● ३ ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात

● मोबाईल अँपद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार नोंदणी

मुंबई ( २५ सप्टेंबर ) : राज्यात यावर्षी मूग व उडीद खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा त्रास वाचावा आणि खरेदी प्रक्रिया सुलभ पद्धतीने पार पडावी यासाठी मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात ३ ऑक्टोबरपासून ८३ उडीद, मूग खरेदी नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सांगितले.

मूग व उडीद खरेदी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पणन राज्यमंत्री खोत यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पणन विभागाचे सचिव, पणन मंडळाचे अधिकारी, वखार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत खोत यांनी, मोबाईल अँपद्वारे मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाईल, शेतकऱ्यांना मूग व उडीद खरेदीसाठी कोणत्या तारखेला आणायचे याबाबत संदेशाद्वारे कळविले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा वेळेचा अपव्यय आणि चकरा टाळल्या जाणार आहे. तरी त्या पद्धतीने योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

स्वच्छ मालाबाबत आवाहन
खरेदी केंद्रावर आणण्यात येणारा माल स्वच्छ आणि चाळणी केलेला आणावा. यासाठी शेतकरी व शेतकरी कंपन्यांना आवाहन करावे, असे देखील खोत यांनी सांगितले. त्यामुळे मूग व उडीद खरेदी प्रक्रिया लवकर आणि वेळेत पार पाडली जाईल, असे ते म्हणाले. 

माल साठवणूक केंद्रांची संख्या वाढवा

राज्यात तब्बल ८३ खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात उडीद व मूग घेऊन येतील. शेतकऱ्यांना त्रास होवू नये यासाठी वखार महामंडळाने राज्यात शेतमाल साठवणूक केंद्र
(वेअर हाऊस) ची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे साठवणूक केंद्र शहरालगतच असावे याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देशही पणन राज्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget