राज्यातील कांदा विक्रीसाठी इतर राज्यात पाठवा - पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत

मुंबई ( २५ सप्टेंबर ) : राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. इतर राज्यात महाराष्ट्रातील कांद्याची असलेली मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने राज्यातील कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

याबाबत मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत खोत यांनी, राज्यातील कांदा इतर राज्यात निर्यात करण्यासाठी पणन मंडळ, महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अभ्यासमंडळ तयार करावे. या पथकाने पंजाब बाजार समितीमध्ये जावून त्याठिकाणी असलेली कांद्याची आवक-जावक, राज्यातील कांदा साठविण्यासाठी लागणारे गोदाम, बाजार भाव, लहान व्यापारी याबाबत माहिती घ्यावी, असेही निर्देश दिले.

प्रायोगिक तत्वावर कांदा निर्यात करण्यासाठी ट्रक भाड्याने घेण्यास आणि पंजाब बाजार समितीमध्ये त्यांच्याशी चर्चा करून गोदाम घेण्यासाठी पणन मंडळाने तरतूद करावी, असे निर्देश राज्यमंत्री खोत यांनी
दिले.

दिल्ली शासनासोबत चर्चा करणार

दिल्ली शासनाची राज्यात धान्य व इतर साहित्य विक्रीसाठी रेशन दुकाने आहेत. या दुकानांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कांदा दिल्लीमध्ये विक्री करण्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री व शासनासोबत चर्चा करावी.
त्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठविण्याबाबतचे निर्देशही खोत यांनी यावेळी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget