एअर मार्शल हेमंत नारायण भागवत यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई (१८ सप्टेंबर ) : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते. रत्नागिरीच्या 16423 एस एअर मार्शल हेमंत नारायण भागवत यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

16423 एस एअर मार्शल हेमंत नारायण भागवत यांना राष्ट्रपती सचिवालयामार्फत अती विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. 16423 एस एअर मार्शल हेमंत नारायण भागवत यांना एकूण 94 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. यापैकी महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम म्हणजे 70 हजार 500 रुपये शासकीय अनुदानातून आणि 25 टक्के रक्कम म्हणजे 23 हजार 500 रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत. ही रक्कम रत्नागिरीच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget