मुंबईकर धावून आले रक्त देण्यासाठी

मुंबई (२९ सप्टेंबर) : परळ-एल्फिस्टन पुलावर आज झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना रक्ताची तातडीची मदत आवश्यक असल्याचे कळताच कित्येक मुंबईकरांनी केईएम रुग्णालयात धाव घेतली. यावेळी ५८ जणांनी आपले रक्त दिले. पण यानंतर ही मुंबईकर रक्त देण्यासाठी केईएम रुग्णालयात येतच राहिले. अखेर या सर्वांचे नंबर आणि त्यांचा रक्ताचा गट लिहून गरज पडल्यास आपल्याला बोलविले जाईल, असे रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना सांगितले. फोनवरून ही रक्त हवे असल्यास मी रक्त देण्यासाठी तयार आहे, असे कित्येक मुंबईकरांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला म्हणत होते. सुमारे ३०० हून अधिक जणांनी रक्त देण्याची तयारी दर्शवली.

दरम्यान, परळ-एल्फिस्टन पुलावर आज झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला यामध्ये १४ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे. तर ३९ जण जखमी झाले आहेत. जखमीं मध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

प्रवाशांना रुग्णालयात दाखल करता करता काहींचा मृत्यु झाला होता. तर काहींचा मृत्यु घटनास्थळी झाला होता. २२ जणांचा मुर्त्यु झाला आहे. ३९ जखमींमध्ये दोघांची प्रकृति चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत, असे सुपे यांनी सांगितले.

दोन रुग्ण वगळता इतर सर्व जखमींवर वार्ड मध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, काहींच्या जखमा अंगावर दिसत नसल्या तरी त्यांना आत मार लागला असण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे अशा जखमींना वार्ड मध्ये चार पाच दिवस ठेवून त्यांच्यावर देखरेख ठेवत उपचार करणे आवश्यक आहे. सिटी स्कॅन रिपोर्ट द्वारे रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे सुपे यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयात दोन सिटी स्कॅन मशिन असून एका सिटी स्कॅन मशिन वापर जखमी रुग्णांसाठीच केला जात असल्याचे सुपे यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयात प्रवाशांना दाखल करण्यात आल्यावर सर्प्रथम अति गंभीर प्रवाशांवर प्राधान्याने उपचार करण्यात आल्याचेही सुपे यांनी सांगितले.

दरम्यान, मृतांची ओळख होत नव्हती. त्यांचे नाव वा इतर काहीच माहिती आमच्याजवळ उपलब्ध नव्हती. मृतांच्या चेहऱ्यावर आणि हातावर नंबर टाकून या सर्वांचे फोटो सर्वत्र पाठविण्यात आले. ज्यानी आपल्या व्यक्तींला ओळखले ते त्यांचा नंबर सांगून त्यांनी त्यांची ओळख पटवून दिली. पण चेहऱ्यावर नंबर टाकल्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याकरीता मी माफी मागतो. पण आम्हाला कोणाच्या भावना दुःखवायच्या नव्हत्या. केवळ मृतांची ओळख होण्यासाठी नंबर टाकावे लागले, असे स्पष्टीकरण सुपे यांनी यावेळी दिले.

मृतांची नावे
१. मुकेश मिश्रा
२. सुभलता शेट्टी
३. सुजाता शेट्टी
४. सचिन कदम
५. मयुरेश हळदणकर
६. अंकुश जैस्वाल
७. ज्योतीबा चव्हाण
८. सुरेश जैस्वाल
९. चंद्रभागा इंगळे
१०. टेरेसा फर्नांडीस
११. रोहित परब
१२. अलेक्सा करीया
१३. हिलोनी देढीया
१४. चंदन गणेश सिंग
१५. मुश्ताक रईस
१६. तेली
१७. प्रियंका पासरकर
१८. मोहम्मद शकील
१९. श्रद्धा वर्पे
२०. मीना वरूणकर
२१. विजय बहादुर
२२. मसूद आलम
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget