स्वाईन फ्लू रुग्णांचा आठवड्याला आढावा घेऊन महापालिका आयुक्तांनी शासनास अहवाल सादर करावा - डॉ. दीपक सावंत

मंबई ( ११ सप्टेंबर ) : स्वाईन फ्लु बाधीत तसेच व्हेंटीलेटवर असलेल्या रुग्णांची नोंद संबंधित महापालिकांनी दररोज ठेवावी आणि त्याबाबत दर आठवड्याला महापालिका आयुक्तांनी आढावा घ्यावा. स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृत्यू कारणमिमांसा (डेथ ऑडीट) महापालिका प्रशासनाने करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिले.

राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. राज्यातील साथीच्या रोगांच्या परिस्थितीचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. बैठकीस समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष
साळुंखे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री म्हणाले, ज्या महापालिकेच्या क्षेत्रातील खासगी रुग्णालयात जास्त संख्यने स्वाईन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला असेल अशा ठिकाणी त्या त्या रुग्णालयातच जाऊन डेथ ऑडीट करण्यात यावे. दर आठवड्याला त्याचा आयुक्तांनी आढावा घेऊन शासनास अहवाल सादर करावा. राज्यातील स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव थोड्या फार प्रमाणात वाढला असला तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती दक्षता आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे.

24 तासांनतरही ताप कमी न झाल्यास स्वाइन फ्ल्यूच्या निदानाची वाट न पाहता ऑसेलटॉमीवीरचे उपचार सुरु करण्याचे निर्देश सर्व डॉक्टरांना देण्यात आले आहेत. ऑसेलटॉमीवीरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, बदलत्या हवामानामुळे सध्या काही भागात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सर्व महापालिकांना त्यांच्या हद्दीतील स्वाइन फ्ल्यूच्या व्हेंटीलेटरवरील रुग्णांची दैनंदिन नोंद ठेवण्याचे तसेच स्वाइन फ्ल्यूमुळे झालेल्या मृत्यूची नोंदणी करतांना रुग्णावर झालेल्या उपचाराची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वाइन फ्ल्यूवर सध्या वापरले जात असलेले ऑसेलटॉमीवीर आणि अॅमेनटेडीन या दोन्ही औषधांच्या संयुक्त वापरातून स्वाइन फ्ल्यूला आळा घालता येऊ शकेल का यासंदर्भातील संशोधनासाठी प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

मलेरियाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी डासांची उत्पत्ती थांबविणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात मुंबई महानगर पालिकेने राबविलेल्या उपाययोजना अतिशय प्रभावी ठरल्या आहेत. हे लक्षात घेऊन राज्यभरातील डासांचे समूळ उच्चाटन करून राज्याला मलेरिया मुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा ‘बीएमसी अॅक्ट’ राज्यभरात लागू करण्यासाठी परिपत्रक काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget