स्थलांतरित मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवांसाठी ट्रॅकिंग सिस्टीम उभारावी – मुख्य सचिव

मुंबई ( २० सप्टेंबर ) : स्थलांतरित मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. ही मुले ज्या ठिकाणाहून स्थलांतरित होतात आणि कुटुंबासह रोजगाराच्या जागी ज्याठिकाणी जातात तिथपर्यंत या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यविषयक बाबींची ट्रॅकिंग सिस्टीम उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे,असे राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज येथे सांगितले.

मुख्य सचिव म्हणाले की, ‘ हवामानात होत जाणारे बदल हे आपल्यासमोरचे आव्हान आहे आणि या पर्यावरणीय बदलांमुळे देखील रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. स्थलांतराचा सर्वाधिक फटका समाजातील गोरगरिबांना बसतो. त्यामुळे या घटकाच्या सर्वसमावेशक विकासावर भर देणे आवश्यक आहे. तशा पद्धतीचे प्रयत्न महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येत आहेत.’ युनिसेफ आणि महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्थलांतर आणि मुले-कृतीपासून धोरणापर्यंत’ या एकदिवशीय आंतरराज्यीय चर्चासत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

बांधकाम व्यवसायात अनेक स्थलांतरित मुले काम करताना आढळून येतात. या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी उपकराच्या माध्यमातून निधी उभारण्यात येत आहे.त्यांना शिक्षण तसेच आरोग्याच्या सेवा पुरविणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या योजनांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच स्थलांतर ज्या ठिकाणी होत आहे, तो प्रदेश आणि जिथून हे स्थलांतर होत आहे अशा दोन्ही प्रदेशांदरम्यान संवाद निर्माण होणे आवश्यक आहे, असेही मल्लिक यावेळी म्हणाले.

युनिसेफच्या महाराष्ट्र प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर यावेळी आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या की, ‘हंगामी स्थलांतरामुळे मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, चांगली आरोग्यसेवा, निवारा या बाबी नाकारल्या
जातात. या परिस्थितीबाबतीत युनिसेफ चिंता वाटते. पुढे हीच मुले बालविवाहाच्या फेऱ्यात अडकतात व त्यामुळे त्यांना अधिकाधिक शोषणास सामोरे जावे लागते. या मुलांना जीविताच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या किमान सुविधा तरी उपलब्ध करून देण्याची खात्री आपण दिली पाहिजे.

यावेळी युनिसेफच्या भारतातील कार्यक्रमाच्या उपसंचालक हेन्रिट अहरेंस, शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, युनिसेफ महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, प्रा. एस. चंद्रशेखर आदी मान्यवर उपस्थित होते. ओडीशा, गुजरात आणि राजस्थान येथून आलेल्या सरकारी शिष्टमंडळानी तसेच ‘हॉर्वड टी चान स्कूल’च्या प्रा. जॅक्लीन भाभा यांनी व्हिडीओ
कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चेत सहभाग नोंदविला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget