नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी केली आझाद मैदानातील मेट्रो-३ च्या कामांची पाहणी

मुंबई ( १२ सप्टेंबर ) : मुंबई शहरातील कुलाबा ते वांद्रे सिप्झ या भूमिगत मेट्रो-३ च्या कामाची आज नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाहणी करून आढावा घेतला.

मुंबईतील एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कुलाबा-वांद्रे सिप्झ मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन तेथील मेट्रो-3 कामांची पाहणी केली. मेट्रोच्या सध्या सुरू असलेले काम, तेथील सुरक्षेच्या उपाययोजना, अत्याधुनिक यंत्रसामुग्री याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. पाहणीच्या वेळी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, महाव्यवस्थापक रवीरंजन कुमार, सहाय्यक महाव्यवस्थापक अभिजित चौधरी, दयानंद चिंचोलीकर आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget