सेवा हक्क आयोगाच्या ऑनलाईन अपील सुविधेचे स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : आता सेवा हक्क आयोगाकडे ऑनलाईन अपील करता येणार असून या सुविधेचे उद्घाटन मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते आज करण्यात आले.

सद्य:स्थितीत राज्य सेवा हक्क आयोगाला पोर्टल/भ्रमणध्वनी ॲपवर पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे केलेला अर्ज, प्रथम व द्वितीय अपील ऑनलाईन दाखल करण्याची व त्यांचा पाठपुरावा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर आयोगाकडे तृतीय अपील ऑनलाईन दाखल करण्याची व त्याचा पाठपुरावा करण्याची सुविधा देखील आजपासून सुरु करण्यात आली आहे. अशा प्रकारे तृतीय अपील दाखल करण्याची ऑनलाईन सेवा देणारा राज्य सेवा हक्क आयोग हा राज्यातील एकमेव आयोग आहे.

महाऑनलाईनच्या पोर्टलवरुन मूळ अर्ज दाखल करणाऱ्या नागरिकांना तुर्तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच इतर विभागांच्या पोर्टलवरुन दाखल करण्यात येणाऱ्या अर्जांसाठीसुध्दा ऑनलाईन तिसरे अपील दाखल करण्याची सुविधा लवकरच सुरु करण्यात येईल. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी
उपयोग करावा, असे आवाहन राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त क्षत्रिय यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget