शिवडी बी. डी. डी. चाळीचा पुनर्विकास इतर बी. डी. डी. चाळीप्रमाणेचे करण्यात येईल - गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर

मुंबई (१८ सप्टेंबर ) : शिवडी येथील बी. डी. डी. चाळीची जागा ही बी. पी. टी. च्या मालकीची असून या चाळीच्या पुनर्विकासासाठी केंद्र शासनाची मंजूरी मिळताच येथील बी. डी. डी. चाळीचा पुनर्विकास इतर बी. डी. डी. चाळीप्रमाणेचे करण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज येथे सांगितले.

वायकर यांनी आज शिवडी बी. डी. डी. चाळीला भेट दिली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, मुंबई बोर्डाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे आदी यावेळी उपस्थित होते.

वायकर पुढे म्हणाले, येथील जागेची मालकी बी.पी. टी. ची असल्यामुळे इतर बी. डी. डी. चाळीप्रमाणे येथील पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले नाही. केंद्र शासनाची परवानगी घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. येथील पुनर्विकासासाठी कन्स्लटंट नेमणूक करण्यात आली असून, केंद्र शासनाची परवानगी मिळताच येथील बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात येईल. इतर बी. डी. डी. चाळीला जे नियम लावले आहेत. त्याच नियमाने येथील रहिवाशांना 500 चौ. फुटाचे घर देण्यात येईल. येथील नागरिकांचेही बायोमॅट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार अरविंद सावंत म्हणाले, शिवडी येथील बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासाबाबत केंद्र स्तरावर मंजुरी मिळण्याबाबत सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीत यासाठी बैठका घेण्यात आल्या आहेत.

आमदार चौधरी यांनी रहिवाशांच्यावतीने विविध मागण्या मांडल्या व रहिवाशांचे याच ठिकाणी पुनर्वसन करताना त्यांना जवळच संक्रमण शिबीरात जागा मिळावी, असेही त्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget