बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही कित्येक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

मुंबई ( १६ सप्टेंबर ) : बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही कित्येक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने प्रवेशाच्या जागा वाढविण्यात याव्यात, अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यंदा 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या कित्येक विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष कला ( F. Y. B.A), वाणिज्य ( F. Y. Bcom) आणि विज्ञान ( F. Y. B.Sc.) शाखेत प्रवेश मिळालेला नाही. यासर्व शाखेच्या प्रवेशाच्या जागा 10 टक्के ने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तावडे यांनी वाढवून दिल्या होत्या. तरी देखील कित्येक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने प्रवेशाच्या जागा 5 टक्के वाढवून मिळाव्यात, अशी मागणी कित्येक महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे केलेली असल्याची माहिती रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिली.

यासोबत व्यावसायिक अभ्यासक्रम BMS, BMM, BAF, BFM मध्ये 20 टक्के प्रवेशाच्या जागा वाढविण्यात आल्या असल्या तरी 2 तुकड्या असणाऱ्या महाविद्यालयांना फक्त 15 टक्के प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. उर्वरित 5 टक्के प्रवेशाच्या जागा कुलगुरूंना वाढविण्याचे अधिकार आहेत. त्यांनी अधिकाराचा वापर करत जागा वाढवून देणे गरजेचे असल्याचे कांबळे म्हणाले.

यासंदर्भात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. प्रवेशाच्या जागा वाढवून मिळव्यात, जेणेकरून एक ही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget