एल्फि‍‍स्‍टन दुर्घटनेतील जखमींची महापौरांनी केईएम रुग्‍णालयात जाऊन केली विचारपूस

मुंबई (२९ सप्टेंबर) : एल्फि‍‍स्‍टन रेल्‍वे स्‍थानकाच्‍या पादचारी पुलावर आज दिनांक २९ सप्‍टेंबर २०१७ रोजी सकाळी चेंगराचेंगरी झाल्‍याचे वृत्‍त कळताच मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी तातडीने घटनास्‍थळाला भेट देऊन पाहणी केली. त्‍यानंतर या अपघातात मृत पावलेल्‍या कुटुंबियांची आणि जखमींची महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केईएम रुग्‍णालयात जाऊन विचारपूस केली तसेच प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्‍याचे निर्देश दिले.

मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधताना म्‍हणाले की, झालेली ही घटना अत्‍यंत दुखःद आहे. परळ- एल्फि‍‍स्‍टन परिसरात मोठमोठया कंपनांचे व्‍यावसायिक कार्यालय असून या स्‍थानकांमधून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करित असतात. यापुढे याप्रकारच्‍या घटना टाळण्‍यासाठी पादचारी पूल रेल्‍वे खात्‍याने रुंद करावा अशी सूचना त्‍यांनी रेल्‍वे विभागाला केली. त्‍याचप्रमाणे महापालिकेच्‍या रुग्‍णालयात पुरेसा औषधीसाठा उपलब्‍ध असून महापालिकेचे डॉक्‍टर व संबधित स्‍टॉफ सर्तकतेने व दक्षतेने कर्तव्‍यात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget