'दृष्टीहिन कलाकारांना मुंबईकरांचा पाठिंबा' या बातमीवर आलेल्या प्रतिक्रिया

मुंबई : महानगरी मुंबईत नुकताच पावसाने थैमान घातला होता. या पावसात मुंबईकरांचे बेहाल झाले खरे परंतु हे मुंबईकर खरे रसिक आहेत याची पावती त्यांनी जोश या कार्यक्रमात दिली. नयन फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस (सामाजिक संस्था ) आणि मेलोडी मार्व्हेलस् यांच्या संयुक्त विद्यमानाने जोश हा सांगितीक कार्यक्रम विलेपार्ले येथे दीनानाथ नाट्यगृहात (१९ सप्टेंबर) प्रेक्षकांच्या साथीने जोशात संपन्न झाला.

हा फार सुंदर कार्यक्रम म्हणावा लागेल. तसेच नयना या माझ्या परिचयाच्या असून त्या अंध मुलांसाठी फार चांगले काम करत आहे. - उदयकुमार शिरुरकर, सहाय्यक आयुक्त - महापालिका बी वार्ड 

अप्रतिम असा कार्यक्रम म्हणावा लागेल.
- भालचंद्र अंबुरे, माजी नगरसेवक

शारीरिक दृष्टया दृष्टिहीन पण मानसिक दृष्टया दिव्य दृष्टी असलेला ''जोश'' ही संगीत मैफिल जोशात सादर होत आहे. बाहेर खुप जोशात पाऊस पडत असताना रसिक ही तेवढ्याच जोशाने कलाकरांना दाद देत होते. म्हणजे चोहीकडे जल्लोष !! या कलाकरांचा उत्साह व जिद्द अशीच उत्तरोत्तर वाढत राहो !!
- प्रा. मनोहर पंडितराव इंदुमती शिंपी

नयन फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस (सामाजिक संस्था ) यांच्या कर्तृत्वाला आणि हिम्मतीला मी धनराज नाईक मनसे विभागध्यक्ष मनसे सलाम करत आहे.
- धनराज नाईक, मनसे मलबारहिल विधानसभा अध्यक्ष

नयन फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस (सामाजिक संस्था ) आणि मेलोडी मार्व्हेलस् यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर झालेला कार्यक्रम हा निसर्गाच्या अनियमितेवर केलेली दृष्टीहीन कलाकारांनी आणि मुंबईकर रसिकजनांनी केलेली मात आहे. हे सर्व पाहून एवढचं सांगेन की,
'' मुद्दते लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता हैं ''। ''मेहनत करनेवालो की कभी हार नहीं होती ''।
- धनंजय कुवेसकार
माजी जिल्हाध्यक्ष, दक्षिण मुंबई युवक काँग्रेस
अध्यक्ष - सहकार्य प्रतिष्ठान

नयन फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस (सामाजिक संस्था ) यांचे फार चांगले सामाजिक कार्य म्हणावे लागेल. फार चांगला कार्यक्रम संपन्न झाला असे दिसत असून पुढील वाटचालीसाठी सर्व अंध कलाकरांना माझ्या तर्फे शुभेच्छा !!
अरविंद मोरे, मार्केटिंग सदस्य, बॅंक ऑफ महाराष्ट्र, पनवेल

पाऊस पडत असताना ही मुंबईकरांनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून अंध कलाकारांना जो प्रतिसाद दिला आहे, त्याबद्द्ल मुंबईकरांना मानाचा सलाम आणि ''जोश'' हा कार्यक्रम अधिकाधिक होऊन अंध कलाकार पुढे आले पाहिजे, याकरिता माझ्या खुप खुप शुभेच्छा !!
- संदीप केदारे, कार्याध्यक्ष, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद

अतिशय सुरेख कार्यक्रम, अंध कलाकारांना आमचा मनापासून सलाम
- महापालिका अधिकारी

हम भी कुछ कम नहीं, हेच जोश या कार्यक्रमातून अंध कलाकारांनी दाखवून दिलेले आहे.
- महापालिका अभियंता

निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला जन्मतःच एक कला दिलेली असते फक्त ती त्या व्यक्तीला समजली पाहिजे आणि समजल्यानंतर त्या कलेला जोपासता आली पाहिजे. खरोखर नयन फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस (सामाजिक संस्था ) आणि मेलोडी मार्व्हेलस् यांच्या संयुक्त विद्यमानाने जोश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दृष्टीहीन मुलांच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश निर्माण करून त्यांना प्रोत्साहीत करण्याचे अमूल्य असे काम करून, समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. ज्या दृष्टिहीन मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा, तसेच तमाम मुंबईकरांनी त्यांना पाठिंबा देऊन दृष्टिहीन कलाकारांच्या मनामध्ये कुठेतरी आशेचे किरण जागे केले, असे म्हणायला हरकत नाही.
- अधिकारी, अग्निशमन दल
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget