मुंबई उपनगरासाठी 100 नवीन लोकल

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली ( २८ सप्टेंबर ) : मुंबई उपनगरीय क्षेत्रासाठी 100 नवीन लोकल रेल्वे मिळणार असून याचा शुभारंभ उद्या 29 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईची जीवन वाहिनी लोकल सेवेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्यावतीने मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेत 100 अधिक नवीन लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रेल्वे मंत्री श्री गोयल यांनी सांगितले. सध्या पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये एकूण 2983 लोकल धावतात. त्या वाढून 3083 लोकल धावतील. या अधिक लोकल सेवांचा लाभ 77 लाख प्रवाश्यांना होणार आहे.

या 100 लोकल सेवामध्ये 32 लोकल या पश्चिम रेल्वे आणि 68 लोकल या मध्य रेल्वेसाठी असणार आहेत.

पश्चिम रेल्वे : यामध्ये 17 लोकल या 1 ऑक्टोबर 2017 पासून ‘अप’ दिशेने तर 15 लोकल सेवा या ‘डाऊन’ दिशेने सुरू होतील. वर्तमानात पश्चिम रेल्वेसाठी एकूण 1323 उपनगरीय लोकल सेवा आहेत, आता त्यात वाढ होऊन 1355 लोकल रूळावरून धावतील.

मध्यरेल्वे : यामध्ये ‘हार्बर लाइन’ आणि ‘ट्रांस-हार्बर लाइन’ वर प्रत्येकी 14 लोकल सेवा 2 ऑक्टोबर 2017 पासून सुरू होतील. तर ‘मुख्य लाइन’वर 16 लोकल सेवा या 1 नोव्हेंबर 2017 पासून होणार आहे. यासह 31 जानेवारी 2018 पासून हार्बर आणि ट्रांस हार्बर लाइनवर 24 लोकल सुरू करण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर 1660 लोकल धावीत असून नव्या 68 लोकल ‍मिळवून 1728 लोकल रूळावरून धावतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget