वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी व्हिडीओ चित्रीकरणाचे आदेश कायम - परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम

मुंबई ( ११ सप्टेंबर ) : वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देताना करावयाच्या कारवाईसाठी व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे आदेश कायम आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी दिली आहे.

व्हिडीओ चित्रीकरणाशिवाय (सीसीटिव्ही शिवाय) वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देण्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेशित केले असल्याच्या आशयाच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या बातम्या तथ्याच्या पूर्णत: विपरीत आहेत. जनहीत याचिका क्र. 28/2013 श्रीकांत माधव कर्वे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणांमध्ये दि. १८ फेब्रुवारी २०१६ रोजी व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसारच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र तपासणीचे काम करण्यात येत आहे. याबाबत स्पष्ट सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व अधिनस्त कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देताना करावयाच्या कारवाईसाठी व्हीडीओ चित्रीकरण करण्याचे आदेश कायम आहेत, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget