सुप्रसिद्ध आर.के. स्टुडिओला आग

मुंबई ( १६ सप्टेंबर ) : शोमैन राज कपूर यांच्या चेंबुर येथील सुप्रसिद्ध आर.के. स्टुडिओला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत स्टुडिओ 1 आणि स्टुडिओ 2 आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून शॉर्ट सर्किटमुळे स्टुडिओला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत स्टुडिओमधील शूटिंगचे बरेचसे सामान जळून खाक झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आग लागली त्यावेळी या स्टुडिओत ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमाचे चित्रिकरण सुरु असल्याचे समजते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget