कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन - सहकार मंत्री सुभाष देशमुख

मुंबई ( २८ सप्टेंबर ) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली.

राज्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर विविध यंत्रणा कार्यरत असून या सर्व यंत्रणेचा समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार नियंत्रण कक्षाची स्थापना मंत्रालयीन स्तरावर करण्यात आली आहे, असे सांगून देशमुख पुढे म्हणाले, या विशेष नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सहकार विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, राज्यातील सर्व बँका, आणि आपले सरकार पोर्टलद्वारे आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील अर्जांची माहिती या सर्वांचे समन्वयाचे कामकाज करण्यात येणार आहे.

विशेष नियंत्रण कक्ष प्रमुख पदी सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक मुंबई, मोहम्मद आरीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षात जिल्हा उपनिबंधक मुंबई-1 डी.एस.साळुंखे, जिल्हा उपनिबंधक मुंबई-2 प्रशांत सोनावणे, जिल्हा उपनिबंधक मुंबई-3 महेंद्र म्हस्के व इतर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget