दृष्टीहिन कलाकारांना मुंबईकरांचा पाठिंबा

पाऊसकोंडीतही मुंबईकरांनी कार्यक्रम बंद पडू दिला नाही

मुंबई : महानगरी मुंबईत नुकताच पावसाने थैमान घातला होता. या पावसात मुंबईकरांचे बेहाल झाले खरे परंतु हे मुंबईकर खरे रसिक आहेत याची पावती त्यांनी जोश या कार्यक्रमात दिली. नयन फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस (सामाजिक संस्था ) आणि मेलोडी मार्व्हेलस् यांच्या संयुक्त विद्यमानाने जोश हा सांगितीक कार्यक्रम (१९ सप्टेंबर) विलेपार्ले येथे दीनानाथ नाट्यगृहात प्रेक्षकांच्या साथीने जोशात संपन्न झाला.

पाऊस कोंडीमुळे मुंबई, ठाण्यातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले परंतु, “काहीही झाले तरी कार्यक्रम थांबला नाही पाहिजे. जे प्रेक्षक आले आहेत त्यांचे रंजन झालेच पाहिजे. शो मस्ट गो ऑन” असे अब्राहम जॉन (जॉन अब्राहमचे वडील) यांनी सांगितले आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

मुसळधार पाऊस पडत असूनही बदलापूर, नालासोपारा, दिवा, वाशी या भागातून दृष्टीहिन कालाकार वेळेत पोहोचले आणि त्यांनी आपले उत्तम सादरीकरण दिले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. तर पाऊसगाणी, प्रेम गाणी, नृत्य, कविता वाचन यांनी कार्यक्रम अधिक रंगत आणली. विनोदी नाटुकल्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले.

भानुप्रताप सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास लाभले. तर, सुफी गायिका रेखा राज, लेखक अहेंद्र उपाध्याय, अभिनेते जितू वर्मा यांनी याप्रसंगी विशेष उपस्थिती दर्शवली. उसगाव मधील १२० आदिवासी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. तसेच मुंबईकरांनी कार्यक्रमाला चांगली गर्दी केली होती.

यावेळी गायक भानुप्रताप सिंह म्हणाले की, “नयन फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस या सामाजिक संस्थेला साथ देण्यास मी नेहमी तयार असेन. ही जगातली एकमेव संस्था जी दृष्टीहिनांसह तुरुंगात जाऊन संगीत कार्यक्रमांचे सादरीकरण आणि आयोजन करते. या संस्थेला, संस्थेच्या उच्च विचारांना माझा सलाम आहे.”

नयन फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस् या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका नयना कुट्टपन यांनी, मुसळधार पाऊस कोसळत असूनही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेक्षकांनी पाठिंबा दर्शविल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget