प्रत्‍येक व्‍यक्‍ति‍ने दिवसातील ५ ते १० मिनिटे स्‍वच्‍छतेसाठी द्यावीत - मुख्‍यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई (१५ सप्टेंबर ): ‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ अंतर्गत संपूर्ण राज्‍यात तसेच विशेषतः मुंबईत मोठय़ा प्रमाणात स्‍वच्‍छतागृहांची निर्मिती करण्‍यात आली असून स्‍वच्‍छतेबद्दल नागरिकांमध्‍ये तसेच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये स्‍पर्धा निर्माण व्‍हावी म्‍हणून केंद्र शासनाने शहरांना क्रमांक देणे सुरु केले असून मुंबई शहराला त्‍यामध्‍ये प्रथम स्‍थान मिळण्‍यासाठी आपण सर्वांनी प्रयत्‍न करुया, तसेच प्रत्‍येक व्‍यक्तिने दिवसातील ५ ते १० मिनिटे स्‍वच्‍छतेसाठी द्यावीत, असे प्रतिपादन महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


ते महापालिका महात्‍मा जोतिबा फुले मंडईत ‘स्‍वच्‍छता हीच सेवा – पंधरवडा’ अभियानाचा शुभारंभ करताना बोलत होते. बृहन्‍मुंबई महापालिकेने कचरा वर्गीकरण करण्‍याचे महत्‍त्‍व नागरिकांच्‍या मनावर ठसविता यावे म्‍हणून चार दिवसीय प्रदर्शनही नुकतेच भरविले होते, असे सांगून त्‍यामध्‍ये विशेषतः ओला व सुका कचऱयाच्‍या वर्गीकरणाबाबत सविस्‍तर माहिती देण्‍यात आली होती, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

महापालिकेने आज एकाचवेळी ८० मंडयांमध्‍ये ‘स्‍वच्‍छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत स्‍वच्‍छता मोहीम आयोजित केली आहे, असे सांगून या मोहिमेंतर्गत बृहन्‍मुंबईतील उद्याने, आस्‍थापना स्‍वच्‍छ तर दिसतीलच,
मात्र नागरिकांनीही सदर उद्याने व मंडया कायमस्‍वरुपी स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी सहभाग घ्‍यावा, असे आवाहन मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी केले.

केंद्र शासनाच्‍या ‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ अंतर्गत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने दिनांक १५ सप्‍टेंबर, २०१७ ते दिनांक २ ऑक्‍टोबर, २०१७ दरम्‍यान ‘स्‍वच्‍छता हीच सेवा’ अभियान आयोजित केले असून त्‍याचा शुभारंभ
महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत महात्‍मा जोतिबा फुले मंडई इमारत, दादाभाई नौरोजी मार्ग, फोर्ट, मुंबई येथे आज (दिनांक १५ सप्‍टेंबर, २०१७) सकाळी पार पडला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, स्‍थानिक आमदार राज पुरोहित, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, महाराष्‍ट्र शासनाचे मुख्‍य सचिव सुमित मल्लिक, महापालिका आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाच्‍या प्रधान सचिव (२) मनीषा म्‍हैसकर, उप आयुक्‍त (घन कचरा व्‍यवस्‍थापन) विजय बालमवार, उप आयुक्‍त (महापालिका आयुक्‍त) रमेश पवार, प्रमुख अभियंता (घन कचरा व्‍यवस्‍थापन) सिराज अन्‍सारी, ‘स्‍वच्‍छ मुंबई अभियान’ चे समन्‍वयक व ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्‍त (बाजार) संजय कुऱहाडे, बाजार व घन कचरा व्‍यवस्‍थापन खात्‍याचे संबंधित अधिकारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी या स्‍वच्‍छता मोहिमेत उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेतला.


महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई बोलताना पुढे म्‍हणाले की, आजपासून पुढील १५ दिवस महापालिकेची उद्याने, मंडयांमधील सर्वांगिण स्‍वच्‍छता कायमस्‍वरुपी रहावी, यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावेत. मुंबई शहर हे भारतातील सर्वांगिण स्‍वच्‍छता असणारे प्रथम क्रमांकाचे शहर ठरावे, यासाठी आपण सर्वांनी आजपासून प्रयत्‍न करुया, असे देसाई यांनी आपल्‍या भाषणात शेवटी नमूद केले.

याप्रसंगी आमदार राज पुरोहित यांनी या पंधरवडय़ानिमित्त महात्‍मा जोतिबा फुले मंडईत आयोजित केलेल्‍या स्‍वच्‍छता मोहिमेबद्दल पालिका प्रशासनाचे कौतुक करुन या मंडईबरोबरच पालिकेच्‍या इतर मंडया,
उद्याने कायमस्‍वरुपी स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी मंडयातील असोसिएशन, पदाधिकाऱयांनी प्रयत्‍न करावेत, असे आवाहन पुरोहित यांनी केले.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी उपस्थित मान्‍यवरांचे स्‍वागत करुन या मोहिमेची रुपरेषा विशद केली. या स्‍वच्‍छता मोहिमेत पालिकेच्‍या घन कचरा व्‍यवस्‍थापन, बाजार खाते, मंडईतील गाळेधारक व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

‘स्‍वच्‍छता ही सेवा’ मोहिमेविषयीः- केंद्र शासनाने दिलेल्‍या सुचनेनुसार राज्‍यातील सर्व नागरी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये दिनांक १५ सप्‍टेंबर, २०१७ ते दिनांक २ ऑक्‍टोबर, २०१७ या कालावधीत ‘स्‍वच्‍छता हीच
सेवा’ म्‍हणून ही मोहीम राबविण्‍यात येणार आहे. मुंबईमध्‍ये एकूण ९४ महापालिका मंडया असून, त्‍यामध्‍येही उद्या या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. दिनांक १५ सप्‍टेंबर, २०१७ रोजी ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ या मोहिमेचा
औपचारिकरित्‍या प्रारंभ करण्‍यात येणार आहे.

दिनांक १७ सप्‍टेंबर, २०१७ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत श्रमदान करुन ‘सेवा दिवस’ म्‍हणून साजरा करण्‍यात येणार आहे. तर दिनांक २४ सप्‍टेंबर, २०१७ रोजी समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करुन ‘समग्र स्‍वच्‍छता’ दिवस म्‍हणून साजरा करण्‍यात येणार आहे. दिनांक २५ सप्‍टेंबर, २०१७ रोजी शहरातील रुग्‍णालये, उद्याने, पुतळे व स्‍मारक, बस थांबे, तलाव आणि स्‍वच्‍छतागृहांची व्‍यापक प्रमाणात सफाई करण्‍यात येणार आहे.

शहरातील सर्व कुटुंबांना व भाजी मंडई, बाजार संघटना, वाणिज्‍यि‍क क्षेत्रामध्‍ये सुक्‍या व ओल्‍या कचऱयासाठी मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या रंगांच्‍या कचरा कुडय़ांचे (Dustbins) वाटप करण्‍यात येणार आहे. भाजी
मंडई, बाजार स्‍थळे या ठिकाणी दुकानदार व व्‍यापाऱयांच्‍या मदतीने स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येणार आहे. मुंबईतील सर्व ऐतिहासिक वारसास्‍थळे, जलस्रोत, जलसाठा, पर्यटन स्‍थळे या ठिकाणी लोक सहभागातून
स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget