राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप स्थगित

मुंबई ( २६ सप्टेंबर ) : राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा उद्या बुधवार दि. 27 सप्टेंबर पासूनचा बेमुदत संप स्थगित करण्यात आलेला आहे. राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात 21 व 22 सप्टेंबर रोजी दोन दिवसांचा संप केला होता. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत दखल न घेतल्यास 27 सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याची नोटीस शासनाला दिली होती.

मुंबई जिल्हा राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसोबत चर्चा करुन रास्त मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे तसेच प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळेची मागणी करण्यात आली असल्याने 27 सप्टेंबरपासून प्रस्तावित असलेला बेमुदत संप स्थगित करण्याबाबत राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांना पत्रान्वये विनंती करण्यात आली होती. याबाबतचा शासनाचा प्रतिसाद लक्षात घेऊन संघटनेने 27 सप्टेंबरपासूनचा बेमुदत संप स्थगित केला आहे, असे उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget