प्रारुप विकास आराखडा २०३४ चे 'डीपी रिमार्क्स' ऑनलाईन

१९९१ चे 'डीपी रिमार्क्स' देखील यापूर्वीच ऑनलाईन उपलब्ध

सुमारे आठवड्याचे काम काही क्षणात शक्य !

मुंबई ( १६ सप्टेंबर ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात भूखंड विकसीत करताना विकास नियोजन आराखड्यानुसार दिले जाणारे 'डीपी रिमार्क्स' (विकास नियोजन अभिप्राय) महत्त्वाचे असतात. महापालिकेचा प्रस्तावित 'प्रारुप विकास आराखडा २०३४' (Draft DP 2034) नुसार असणारे 'डीपी रिमार्क्स' देखील भूखंडावरील विकास प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता 'प्रारुप विकास आराखडा २०३४' नुसार असणारे 'डीपी रिमार्क्स' ऑनलाईन उपलब्ध करुन दिले आहेत. ज्यामुळे संबंधितांना महापालिका कार्यालयात न येता ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरुन व अर्ज करुन काही मिनीटांत हे रिमार्क्स मिळविता येणार आहेत, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

महापालिका क्षेत्रात भूखंड विकसीत करणे, इमारतीचा पुनर्विकास करणे व कोणतेही विकास काम करताना 'डीपी रिमार्क्स' प्राप्त करुन घेणे गरजेचे असते. या रिमार्क्समध्ये प्रामुख्याने भूखंडावर आरक्षण असेल तर त्याबाबतची माहिती, भूखंड कोणत्या क्षेत्रात (Zone) आहे त्याची माहिती (उदा. Residential Zone); इत्यादी माहितीचा समावेश असतो. एखाद्या भूखंडाचे 'डीपी रिमार्क्स' मिळविण्यासाठी यापूर्वी महापालिकेच्या 'नागरी सुविधा केंद्रात' (CFC) येऊन शुल्क अदा केल्यानंतर विकास नियोजन खात्याकडे अर्ज करावा लागत असे. त्यांनतर साधारणपणे ७ दिवसात हे 'डीपी रिमार्क्स' मिळत असत.

मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने घरी किंवा आपल्या कार्यालयात बसून केवळ काही क्षणात 'डीपी रिमार्क्स' व संबंधित नकाशा प्राप्त करुन घेणे आता शक्य झाले आहे. १९९१ च्या मंजूर विकास आराखड्यानुसार असणारे 'डीपी रिमार्क्स' यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता २०३४ च्या प्रस्तावित प्रारुप विकास आराखड्यानुसार असणारे 'डीपी रिमार्क्स' देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याकरिता महापालिकेद्वारे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून प्रत्यक्ष येऊन अर्ज करण्यासाठी जेवढे शुल्क आकारले जाते, तेवढेच म्हणजे रुपये २ हजार प्रति रिमार्क एवढे शुल्क आकारले जाणार आहे.

'डीपी रिमार्क्स' ऑनलाईन प्राप्त करुन घेण्यासाठीची पद्धत महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर आपल्या डाव्या हाताला 'संबंधित दुवे' (Related Links) असे शीर्षक असणा-या रकान्याच्या शेवटी 'अधिक' (More) या शब्दावर क्लिक करावे. यानंतर उघडणा-या पानावर 'Draft DP 2034' अशी लिंक आहे, त्यावर क्लिक करावे. यानंतर उघडणा-या 'लॉग इन पेजवर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आपल्याला ज्या भूखंडाबाबत रिमार्क्स हवे असतील, तो भूखंड महापालिकेच्या २४ विभागांपैकी ज्या विभागात येतो तो विभाग निवडावा. त्यानंतर भूखंडाचा सीटीएस / सीएस / टीपी क्रमांक नमूद करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने आवश्यक तेवढ्या शुल्क रकमेचा भरणा केल्यावर प्रारुप विकास आराखडा २०३४ नुसारचे डीपी रिमार्क्स व नकाशा तात्काळ ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget