पुढील महिन्यापासून परीक्षा ; कित्येक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित


मुंबई ( २१ सप्टेंबर ) : 'बारावी' आणि 'दहावी' चा निकाल लागून 3 महिने उलटले तरी आजही कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसताना ही महाविद्यालयांमध्ये पुढील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासून सुरू होणाऱ्या परिक्षेचे वेळापत्रक घोषित झालेले आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या जागा शिल्लक आहेत, अशा महाविद्यालयांनी तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परीक्षा घेऊ नये, अशी मागणी उपसंचालक बी बी चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे मनसेचे मलबारहिल विधानसभेचे अध्यक्ष धनराज नाईक यांनी सांगितले.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ असल्यानेच दहावी आणि बारावीचा निकाल लागून कित्येक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचा आरोप नाईक यांनी केला असून याबाबत गिरगांव, ताडदेव, गावंदेवी, खेतवाडी आदी मलबारहिल विधानसभेच्या परिसरातील कित्येक विद्यार्थी आणि पालक तक्रारी घेऊन आमच्याकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये जाऊन फॉर्म भरून प्रवेश घेत होते. ही प्रवेश प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होत असे. पण आता ऑनलाइन प्रक्रियेद्वारे प्रवेश प्रक्रिया जलद होण्याऐवजी निकाल जाहीर होऊन तीन महिने उलटले तरी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. मलबारहिल परिसरातच जर कित्येक विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त होत असतील तर मुंबईत ही संख्या किती असेल, असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेपूर्वी विद्यार्थी आपल्याला हवे ते महाविद्यालय आपल्या टक्केवारीच्या बळावर मिळवत होता. मग ते महाविद्यालय त्याच्या घरापासून दूर असले तरी त्या ठिकाणी त्याची प्रवेश घेण्याची इच्छा असायची. पण आता ऑनलाइन प्रक्रियेत राहत्या घरापासून महाविद्यालय दूर असल्याने त्या विद्यार्थ्याला ते महाविद्यालय मिळाले नाही, असे कारण सांगितले जाते. तर ज्याचे गुण कमी आहेत, अशांना त्यांच्या टक्केवारीनुसार दूरचे महाविद्यालय मिळाले आहे, असे काहीही उत्तरं विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मिळत असल्याचे ही नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यापीठाचा निकाल वेळेवर न लागल्याने यंदा कित्येक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून मुकावे लागले आहे. त्यात आता कित्येक विद्यार्थ्यांना तेरावी आणि अकरावी इयत्तेत प्रवेश मिळालेला नसताना ही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे योग्य नसून काही महाविद्यालयांत परीक्षा ही सुरु झाल्या आहेत. आपण याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या जागा शिल्लक आहेत, त्या महाविद्यालयांमध्ये तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget