रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाची दखल ; बालवाडी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ

मुंबई १७ सप्टेंबर ) : रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आझाद मैदानात करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेत येत्या 3 महिन्यात मुंबई महापालिकेच्या बालवाडी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचा पगारवाढी संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची ग्वाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

पालिकेच्या शिक्षण विभागात 540 बालवाड्या सुरू आहेत. त्यामध्ये 1 हजार 8 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला होता, असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष - कामगार नेते रमेश जाधव यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सध्या बालवाडीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना 3 हजार रुपये आणि मदतनीसांना दीड हजार रुपये मानधन मिळते. स्थायी समितीने शिक्षकांसाठी 5 हजार रुपये आणि मदतनीसांना 3 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र हा प्रस्ताव महासभेत मंजूर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले.

दरम्यान, रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेऊन पगारवाढीचा प्रस्ताव तीन महिन्यात महासभेत मंजूर करण्याची गवाही आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्यमंडळात रमेश जाधव, शुभांगी म्हाळूनगे, सीता चौधरी, अनुराधा कांबळे, शुल्भा महाडेश्वर, चंद्रकांत शिंदे होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget