शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी 28 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत

मुंबई ( २७ सप्टेंबर ) : मुंबई शहरामध्ये शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला असून दि. 28 सप्टेंबर 2017 ते 6 नोव्हेंबर 2017 या कालावधीत या मतदार संघासाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या मतदार संघांसाठी पूर्ण: नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. पदवीधर मतदारसंघामध्ये नांव नोंदणी करण्यासाठीचा नमुना-18 व शिक्षक मतदारसंघामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी नमुना-19 मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.

मुंबई व कोकण विभागातील पदवीधर व मुंबई विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक- 28 सप्टेंबर 2017, या अधिनियमाच्या कलम 31 (4) नुसार वर्तमानपत्रातील जाहीर नोटीसीची पुनर्प्रसिद्धी- 13 ऑक्टोबर, कलम 31 (4) नुसार वर्तमानपत्रातील जाहीर नोटीसीची द्वितीय पुन:प्रसिद्धी- 25 ऑक्टोबर 2017, नमुना 19, नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक- 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- दि. 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची छपाई- 21 नोव्हेंबर 2017, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2017, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दिनांक 15 जानेवारी 2018 आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 19 जानेवारी 2018 रोजी करण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget