राष्ट्रीय सेवा योजनेतून आदर्श गाव निर्माण व्हावे – विनोद तावडे

राज्यस्तरीय पुरस्कारांचे दिमाखात वितरण

मुंबई ( २४ सप्टेंबर ) : महाविद्यालयांनी एखादे गाव दत्तक घेत शासकीय योजना राबवाव्यात व त्या गावाचा कायापालट करुन सर्वार्थाने एक आदर्श गावं निर्माण करावे,असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या कन्व्हेंशन हॉल येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

तावडे म्हणाले, समाजात असे अनेक प्रश्न आहेत ज्यांना राष्ट्रीय सेवा योजनेने हात घालणे गरजेचे आहे. मुंबई ते मोखाडा ही दरी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संपायला हवी. पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करताना तावडे म्हणाले, विजेते सर्वार्थाने वेगळे आहेत कारण समाजातील प्रश्नांची जाण त्यांना बाहेरचं जग अनुभवल्या नंतरच येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दुर्गम अतिदुर्गम भागातील मुलांचा सर्व्हे करावा व अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे. वीट भट्टीवरील मुलांच्या पालकांना रोजगारासाठी नोव्हेंबर नंतर स्थलांतर करावे लागत असल्याने स्थलांतरीत ठिकाणच्या शाळेत मुलांचे प्रवेश संलग्न होणं गरजेचं असल्याचेही ते म्हणाले. यावेळी तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भाषा ही नोकरीसाठी आवश्यक असणारी बाब असल्याने ज्ञानप्राप्तीसाठी भाषेचा अडथळा येता कामा नये असेही ते म्हणाले. डॉ. अतुल साळुंखे यांनी प्रस्ताविक केले.

दरम्यान या वेळी 2014 - 15 व 2015 - 16 या वर्षातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

2014-15 चे पुरस्कारविजेते असे:

उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार:

१. विनायक भास्कर राजगुरु, के.टी.एच.एम. महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक

२. समीर श्रीधरराव भोयर, राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड, जि. चंद्रपूर

३. सीमा दिलीप गावडे, श्री. शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापुर

४. श्वेता राजेंद्र फुके, लेडी अमृताबाई डागा कॉलेज फॉर वुमेन आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स, नागपुर

५. ज्योती सिद्धार्थ मलवार, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

६. सायली कोमल खैरनार, श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ, जि. जळगांव

७. ज्योती किशोर म्हात्रे, सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा (आगाशी), जि. पालघर

८. जयस्वाल रोहन सुभाषलाल, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर

९. चव्हाण प्रेमराज पांडुरंग, कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे

१०. अंजली अशोकराव ताजणे, छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय, मोरवा, जि. चंद्रपूर

११. राकेश पद्माकर मीना गायकवाड, समाज विज्ञान केंद्र एरंडवणे, पुणे

१२. तारिक लतीफ तांबोळी, द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर

१३. सागर राजू रोढे, कृषि महाविद्यालय अकोला, अकोला

१४. चांडक सचिन सत्यनारायण, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय, शेगांव

१५. पूनम गोपाळा खरात, स्व. भास्कराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा.

उत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक पुरस्कार

१ राजाभाऊ नारायणराव करपे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार

१ सतीश श्रीधर कोलते, मुंबई विद्यापीठ, मुंबई

२ प्रा. डॉ. भारत विठ्ठलराव शिंदे, माधवराव पाटील महाविद्यालय, ता. पालम, जि. परभणी

३ डॉ. सविता सुनिल कुलकर्णी, प्रा. रामकृष्‍ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्याल, आकुर्डी, पुणे,

४ जाधव सुरेश नाना, यशवंतराव चव्हाण इन्सिस्टीट्यूट ऑफ सायन्स सातारा.

कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार

१ डॉ. कल्याणकर पांडुरंग मारुतराव, श्री सावता माळी, ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री, जि.

औरंगाबाद

२ प्रा. इमॅन्युएल एस कोन्ड्रा, जनता महाविद्यालय, सिव्हील लाईन्स, नागपुर रोड, चंद्रपूर.

३ उल्हास सुधाकर मोगलेवार, संत गाडगे महराज महाविद्यालय, हिंगणा, नागपुर

४ संतोष पुंडलिक राजगुरु, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला विद्यालय, सोलापूर

५ डॉ. सौ. माधुरी हेमंत वाघ, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपुर

६ प्रजापती रेणुका महेश, श्रीमती एम.एम.पी. शहा, महिला कला आणि वाणिज्य महाविद्यालय , माटुंगा, मुंबई

७ अनिल मारोतीराव कांबळे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

८ प्रा. राजेंद्र विश्वास कोळेकर, यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर

९ प्रा. दिलीप बा. चौधरी, छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा, चंद्रपूर

१० डॉ. आर. यू. बुरंगे,जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा

११ अमर वसंत जावळे, आप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी, जि. जळगांव


2015-16 चे पुरस्कार

सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक पुरस्कार

1. डॉ. भाऊ दायदार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर.

2. डॉ. बब्रुवान नामदेव कांबळे, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार

१. डॉ. शिवराज चंद्रकांत बोकडे, यशवंत महाविद्याल, नांदेड

२. विजय संपतराव फाळके, भारतीय विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय

३. डॉ. केशव माणिक वाळके, मातृसेवा संघ समाजकार्य संस्था, बजाजनगर, नागपूर

४. प्रा. संतोष पांडुरंगजी बनसोड, कला महाविद्यालय, बडनेरा, अमरावती

५. संजय दिनकराराव कोकाटे, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.

६. डॉ. विरभद्र चनबस दंडे, द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर

७. डॉ. पुरुषोत्तम विष्णू देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

८. डॉ. अदिनाथ जालिंदर मोरे, नुतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नाशिक

९. स्वाती एम. देशमुख, वसुधाताई देशमुख कृषि महाविद्यालय, बोंडणा, जि. अमरावती.

१०. स्नेहल मकरंद राजहंस, कृष्णा महाविद्यालय रेठरे बु. जि. सातारा

११. केतन आर. रावल, एम. पी. व्ही. वालिया महाविद्यालय, बोरीवली

१२. नितीन पवार, डॉ. भानुबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स, माटुंगा

१३. डॉ. विजया यादवराव गेडाम, डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर.

१४. संदीप उत्तमराव सूर्यवंशी, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

१५. डॉ. स्वानंद शुक्ल, मोतीवाला होमीओपॅथिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल, नाशिक

१६. अभिजीत कलिचंद कंडेरे, राजीव गांधी कृषि महाविद्यालय, परभणी

उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार

१. शानेदिवान सोनिया राजेखान, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

२. नम्रता श्रीधर शिंदे, कृषि महाविद्यालय दापोली

३. शेख आफताब अन्वर, द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर

४. मिलींद होनाजी प्रधान, गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा, जि. गडचिरोली

५. रेखा गंगाधर गोकावार, लालबहादुर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद, जि. नांदेड

६. विठ्ठल हरिभाऊ नागरे, विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

७. डिंपल कालिदास मकवाना, एम.एम. पी. शाह महाविद्यालय, माटुंगा

८. अरविंद प्रभाकर कायंदे, कृषि महाविद्यालय विद्यानगर, कोल्हापूर

९. विजय राजेंद्र केर्लेकर, डि. टी. एस. एस. महाविद्यालय, मलाड, मुंबई

१०. स्नेहल विनय चव्हाण, कृषि महाविद्यालय, अकोला

११. प्रसाद बाळासाहेब जाधव, टीएसएसएमचे भिवराबाई सावंत अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, नऱ्हे, पुणे.

१२. किसन लक्ष्मण गडगुंडे, यशवंतराव मोहिते महाविद्यालय, एरवंडणे, पुणे

१३. शुभांगी रमेश साकुरे, जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा

१४. ॲन मेखा साजी, पी. डी. हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंग, अंधेरी, मुंबई

१५. रेवणसिद्ध विजय जवळेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget