लेप्टनंट जनरल अशोक शंकर आंब्रे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई (१८ सप्टेंबर ) : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते. रत्नागिरीच्या आयसी 38708 लेप्टनंट जनरल अशोक शंकर आंब्रे यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

आयसी 38708 लेप्टनंट जनरल अशोक शंकर आंब्रे यांना राष्ट्रपती सचिवालयामार्फत अती विशिष्ठ सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेअति विशिष्ठ सेवा पदक मिळविणाऱ्यांना 94 हजार रुपये अनुज्ञेय रक्कम मंजूर आहे. यापैकी लेप्टनंट जनरल अशोक शंकर आंब्रे यांना 85 हजार रुपये देण्यात आले असून उर्वरित 9 हजार रुपये रक्कम रत्नागिरीच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget