१०५२ अनधिकृत फेरीवाल्‍यांवर महापालिकेची धडक‍ कारवाई

१ कोटी १८ लाख ३१ हजार रुपये इतक्‍या विमोचन आकाराचा माल जप्‍त

मुंबई (२९ सप्टेंबर) : बृहन्‍मुंबई महापालिका आयुक्‍तांच्‍या आदेशानुसार अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए.एल.ज-हाड यांच्‍या मार्गदर्शनाखाली दि.२१ व २८ सप्‍टेंबर २०१७ या दोन दिवशी विशेष मोहिम राबवून महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाच्‍या पथकाने १०५२ अनधिकृत फेरीवाल्‍यांवर धडक कारवाई करुन ८० चारचाकी हातगाड्या व ५० सिलेंडर्ससह १ कोटी १८ लाख ३१ हजार रुपये इतक्‍या विमोचन आकाराचा माल जप्‍त करण्‍यात आला.

खाद्यपदार्थ रस्‍त्‍यांवर बनवून विकणे, रेल्‍वेस्‍टेशन परिसरातील फेरीवाला इत्‍यादी अतिक्रमणांवर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्‍याकरिता प्रत्‍येक विभाग कार्यालयात एक विशेष पथक तयार करण्‍यात आले आहे. तसेच दर गुरुवारी प्रत्‍येक परिमंडळातील उप आयुक्‍तांना त्‍यांच्‍या अधिपत्‍याखालील विशेष पथकांना एकत्र करुन एक संयुक्‍त कारवाई करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. दि. २१ व २८ सप्‍टेंबर २०१७ या दोन दिवशी करण्‍यात आलेल्‍या कारवाईच्‍या वेळी सर्व विभागाचे उपायुक्‍त, सहायक आयुक्‍त, उप अनुज्ञापन अधीक्षक, सहायक अनुज्ञापन अधीक्षक, वरिष्‍ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) व वाहन निरीक्षक हे उपस्थित होते. ९२२ अनधिकृत फेरीवाल्‍यांसह एकूण १०५२ अनधिकृत फेरीवाल्‍यांवर ही कारवाई करण्‍यात आली. जप्‍त केलेल्‍या सिलेंडर्ससंबंधी संबंधि‍त पोलि‍स स्‍टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्‍याकरिता पत्र देण्‍यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget