अंगणवाडी सेविकांचे मानधन 6 हजार 500

मंत्री पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पोषण आहार वाटप सुरू करण्याचे आवाहन

मुंबई ( २२ सप्टेंबर ) : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजारावरून 6 हजार 500 तर मदतनीसांचे मानधन अडीच हजार रूपयांवरून 3 हजार 500 रूपये, मीनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 3 हजार 250 रूपयांवरून 4 हजार 500 रूपये करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोषण आहार वाटपाचे काम सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, या आधी 2014 -15 मध्ये अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. त्यावेळी शासनाने 289 कोटीं रूपयांची ही मानधनवाढ केली होती. त्यानंतर पुन्हा अंगणवाडी सेविकांना न्याय मिळावा, म्हणून सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अहवालानुसार पुन्हा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. शासन अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे वेळोवेळी संघटनांच्या बैठकीमध्ये सांगण्यात आले.
शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बऱ्याच अंगणवाडी सेविका कामावर परतल्या असून राज्यातील 25 टक्के अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वाटपाचे काम सुरूही झाले आहे. या योजेनचा मुख्य उद्देश ० ते 6 वयोगटातील बालकांना तसेच गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना पोषण आहार मिळावा हे आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोषण आहार वाटपाचे काम सुरू करावे, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

भाऊबीज दुपटीने वाढविली

शासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1 हजार रूपयांची भाऊबीज दिली जाते. या रक्कमेत दुपटीने वाढ करून 2 हजार रूपये देण्यात येणार आहे. मानधनवाढीपोटी 311.33 कोटी रूपये तर भाऊबीज पोटी 52 कोटी रूपयांचा अतिरिक्त भार शासनावर पडणार आहे. महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन थेट लाभ हस्तांतरण (DBT) अंतर्गत सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे (Public Financial Management System) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते, त्यामुळे मानधनाला होणारा विलंब टळला आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget