भर पावसात काँग्रेसचे नगरसेवक नरवणकर यांनी पेट्रोल दरवाढी विरोधात केले आंदोलन

मुंबई ( १९ सप्टेंबर ) : भाजप सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे प्रभाग क्रमांक २१६ चे नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी मंगळवारी पेड्डर रोड, डी. बी. रोड आणि बी. डी. रोड येथील पेट्रोल पंपच्या बाहेर निर्दशने केली. दुपारी सुरु झालेल्या मुसळधार पावसात नरवणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन सुरुच ठेवले. त्यामुळे या आंदोलनाकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

आंदोलनकर्त्यांने आपल्या हातात पेट्रोल दरवाढीच्या निषेधाचे फलक पकडले होते. या फलकावर 'जागो मुंबईकर जागो', असा उल्लेख करत ३ वर्षात गगनाला भिडलेल्या पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला होता. यासोबत एका वर्षात ११ वेळा भाव वाढलेल्या स्वयंपाकाच्या दरवाढीच्या गॅसचा उल्लेख फलकावर करत लोकांना जागरूक करण्याचे काम ही नगरसेवक नरवणकर यांनी आपल्या आंदोलनातून केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget