परळ-एल्फिस्टन पुलावर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा मृत्यू

मुंबई (२९ सप्टेंबर) : परळ-एल्फिस्टन पुलावर आज झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. प्रवाशांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एका महिला प्रवाशीच्या म्हणण्यानुसार, लोक पुलावरून जात होते. इतक्यात पाऊस सुरू झाल्याने काही लोक पुलावर थांबले. त्यात परळ आणि एलफिन्स्टन दोन्ही स्टेशनांवर एकापाठोपाठ एक लोकल ट्रेन येत होत्या आणि पुलावरची गर्दी वाढतच होती. त्यामुळे पुलावर गर्दी वाढल्याने लोकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आणि चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, मुंबईतील एल्फिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असून जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे तावडे यांनी केली. तावडे यांनी केईएम रूग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची विचारपूस केली.

२२ मृतांपैकी १७ मृतांची ओळख पटली आहे. पाच मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.


मृतांची नावे

१. मुकेश मिश्रा
२. सुभलता शेट्टी
३. सुजाता शेट्टी
४. सचिन कदम
५. मयुरेश हळदणकर
६. अंकुश जैस्वाल
७. ज्योतीबा चव्हाण
८. सुरेश जैस्वाल
९. टेरेसा फर्नांडीस
१०. रोहित परब
११. अलेक्सा करीया
१२. हिलोनी देढीया
१३. चंदन गणेश सिंग
१४. मोहम्मद शकील
१५. श्रद्धा वर्पे
१६. मीना वरूणकर
१७. मसूद आलम

बऱ्याच जखमी प्रवाश्यांना रक्ताची तातडीची गरज आहे.
ए-नीगेटीव्ह (A-), बी- निगेटीव्ह (B-), एबी निगेटीव्ह (AB-) रक्तगट असणाऱ्यांनी केईएम रुग्णालयाशी लवकरात लवकर संपर्क करा. २४१३६०५१, २४१३ १४१९ आणि २४१०७०२० या क्रमांकावर संपर्क साधावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget