पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते मच्छिमार सोसायटीला 25 लाखाचा धनादेश

मुंबई ( १३ सप्टेंबर ) : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते दाभोळ खाडी मच्छिमार सोसायटीला उदरनिर्वाहासाठी 25 लाखाचा धनादेश देण्यात आला.

लोटे (ता.चिपळूण) येथील औद्योगिक वसाहतीमधील सामूहिक सांडपाणी यंत्रणेद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे मास्यांच्या उत्पादनात घट झाली होती. अनेक ठिकाणी खाडी किनाऱ्यावर मृत मासे आढळले होते. या संदर्भात मच्छिमार सोसायट्यांनी तक्रार केली होती. मंत्री कदम यांनी व्यक्तिश: लक्ष घालून सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचे अध्यक्ष सतीश वाघ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून 25 लाखांचा धनादेश आज मच्छिमार सोसायट्यांच्या नुकसानीपोटी दिला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget