एलफिन्स्टन रोड-परळ रेल्वे पूल दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखाची मदत

· जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाकडून

· दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

मुंबई (२९ सप्टेंबर) : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड (प्रभादेवी) आणि परळ स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलावर आज झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च शासनाच्यावतीने करण्यात येणार असून या दुर्घटनेची राज्य सरकार आणि रेल्वे विभागाद्वारे सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री म्हणाले, ही दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खद असून मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन सर्व जखमींना योग्य उपचार तात्काळ मिळवून देण्यासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशीदेखील या दुर्घटनेबाबत चर्चा केली असून या घटनेची राज्य शासन व रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget