सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी सुरु केली बी वॉर्डात स्वच्छता मोहीम

मुंबई (२९ सप्टेंबर) : महापालिकेचे बी वार्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी आपल्या बी वॉर्डात स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या स्वच्छता मोहीम अंतर्गत स्वच्छता पदयात्रा आणि पथनाट्याचे सादरीकरण करुन लोकांमध्ये जनजागृता करण्याचे कार्य सुरु केले आहे.

गुरुवारी त्यांनी आपल्या बी वॉर्डात स्वच्छता पदयात्रा काढली होती. शुक्रवारी पुन्हा त्यांनी बी वॉर्डात स्वछता पदयात्रेचे आयोजन केले. स्वच्छ्तेविषयी लोकांमध्ये जागरूता निर्माण व्हावी, याकरीता स्वछता पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आल्याचे शिरुरकर यांनी सांगितले.

शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता पदयात्रेत जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर सहभागी झाले होते. सोबत डोंगरी महापालिका शाळेतील बच्चे कंपनी ही छान छान कपडे घालून सामील झाले होते.

पदयात्रेला बी वार्ड कार्यालयपासून सुरुवात झाली. पुढे डोंगरी परिसरातून पदयात्रा मस्जिद बंदर स्थानकात पोहचली. येथे आल्यावर जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्वच्छ्ते विषयी लोकांमध्ये जागृती करणारे पथनाट्य सादर केले.

सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी सुरु केलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमाला विभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget